पोलीस स्टेशन हिंगणघाट जिल्हा वर्धा नातच निघाली घरांतील दागिने चोरी करणारी पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे फिर्यादी नामे सौ.पोर्णिमा इंद्रनिल रंगारी वय 69 वर्श, रा. महात्मा फुले वार्ड, अहीले मस्जीद जवळ हिंगणघाट यांनी तोंडी रिपोर्ट दिली की, दि दि. 10/01/2025 चे 12.00 वा ते दि. 24/10/2025 चे 12.00 वा दरम्यान फिर्यादी व तिचे सुन नामे ज्योती रंगारी यांचे कपाटातील लाँकर मध्ये असलेले 1) दोन 60 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बांगडया किंमत अंदाजे 36,000 रू 2) सुनेचे 3 अंगठया, दोन नथ व कानातील दोन टॉप्स सर्व 20 ग्रॅम किंमत अंदाजे 13,200 रू असा एकुण 80 ग्रम वजनाचा जु.किं. 49, 200 रू चा माल कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेले. अश्या फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून अज्ञात आरोपीविरूध्द सदरचा गुन्हा नोंद असून सदर गुन्हयांतील अज्ञात आरोपी शोध कामी मा. अनील राऊत, पोलीस निरीक्षक सा. हिंगणघाट यांचे आदेशाने सदर गुन्हयाचा तपासा दरम्यान यातील फिर्यादी व तिची सुन नामे ज्योती रंगारी यांनी दिलेल्या माहीतीवरून फिर्यादीची नात १) पूर्वा रंगारी वय १८ वर्ष शिक्षण बी .टेक.हल्ली मु.बुटीबोरी हिला विचारपूस केली असता तिने तिचे आजीची व आईचे कपाटात ठेवलेले वरील वर्णनांचे सोने आवश्यकतेनुसार टप्प्याटप्याने चोरून नेऊन तिचा मित्र आरोपी २) वंश प्रमोद राऊत वय १८ वर्ष रा. हिंगणघाट याला विकण्यासाठी देउन त्याने ते सोने त्याची आई आरोपी क्र.३) रूपाली प्रमोद राऊत रा.हिंगणघाट हिचे माध्यमातून सोने विंकुन दिल्याने आरोपी क्र.१ व २ यांनी सोने विकून मिळालेले 7,97,000 रू. हॉटेलिंग व फोर्ड फिगो कंपनीची कार, बजाज एनएस 200 दुचाकी, आय फोन खरेदी केल्याचे सांगितल्याने आरोपीतांकडून गुन्ह्यात सोने विकून आलेल्या पैश्याची विकत घेतलेला फोर्ड कंपनीची कार,बजाज एनएस 200 दुचाकी व आय फोन जप्त केले, तसेच आरोपीने विकलेले ८0 ग्रॅम सोने सोनाराकडून जप्त करून सदर गुन्हा उघडकीस आणला. ही संपूर्ण कारवाई मा.पोलीस अधीक्षक अनुराग जैन साहेब, मा.अप्पर पोलीस अधीक्षक सदाशीव वाघमारे साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक सा. व मा. अनिल राऊत, पोलीस निरीक्षक सा. हिंगणघाट यांचे आदेशाने पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील सपोनि दिपक वानखडे सा. व सपोनी पद्ममाकर मुंडे सा. यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात डि.बी. पथकाचे पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, पो.ना राजेश शेंडे, पोशी आशिष नेवारे,पो.शि. मंगेश वाघमारे, पोशी रोहीत साठे यांनी केली. सदर गुन्हयांचा पुढील तपास हिंगणघाट पोलीस करत आहे.

पोलीस स्टेशन हिंगणघाट जिल्हा वर्धा नातच निघाली घरांतील दागिने  चोरी करणारी                                                                               
Previous Post Next Post