महिला स्वयंपूर्ण व्हाव्यात यासाठी त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध केली‌ -- सरपंच बेल्हे, मनिषा डावखर बेल्हे, ता. १६:- येथील जिल्हा परिषद शाळा नंबर एक येथे महिलांनी महिलांसाठी दिवाळी फराळासह इतर वस्तूंचे स्टॉल्स लावले असून, या महिला उद्योजकांच्या दीपावली महोत्सव प्रदर्शन व विक्री याचे उद्घाटन, बेल्हेच्या लोकनियुक्त सरपंच मनिषा डावखर, ग्रामपंचायत सदस्या पल्लवी भंडारी व उपस्थित महिला उद्योजकांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये घरगुती फराळ, हस्तकला वस्तू, पणत्या, कंदील, चप्पल, मेहंदी काढणे, आणि ईतरही सजावटीचे सामान यांचा समावेश आहे, ज्यातून महिला उद्योजक आणि बचत गटांना रोजगाराची संधी मिळणार आहे. यामध्ये दिवाळी फराळात विविध प्रकारचे लाडू आणि इतर पारंपरिक दिवाळी फराळ हे पदार्थ घरगुती चवीचे आणि स्वस्त दरात उपलब्ध आहेत. त्याचबरोबर हस्तकला आणि सजावटीच्या वस्तू, महिलांनी हातांनी तयार केलेल्या सुंदर कलाकुसर, सजावटीचे सामान, ज्वेलरी, गिफ्ट आर्टिकल्स आणि घरासाठी उपयुक्त वस्तू, महिलांसाठी मेकअपच्या वस्तू या ठिकाणी उपलब्ध आहेत.तसेच दिवाळीसाठी आवश्यक असलेले पारंपरिक आणि आधुनिक व आकर्षक कंदिल आणि पणत्याही उपलब्ध होत्या.तसेच रांगोळी, उटणे, कपडे आणि सौंदर्यप्रसाधने यांसारख्या वस्तू देखील उपलब्ध होत्या. या उपक्रमाच्या प्रमुख आयोजक ग्रामपंचायत बेल्हे यांच्यासह सरपंच मनिषा डावखर व ग्रामपंचायत सदस्या पल्लवी भंडारी या असून महिला बचत गट आणि ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करण्यासाठी व स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन मिळून कारागिरांच्या हाताला बळ मिळते आणि त्यातून अर्थाजनही होते. तसेच ग्राहकांना करमुक्त असलेले आणि घरगुती चवीचे स्वस्त दराचे फराळाचे पदार्थ मिळणार असून, यामुळे आपल्याच गावातील महिलांना रोजगार मिळणार असून त्यांची दिवाळी गोड होणार आहे असे आम्हाला वाटते. या ठिकाणी संपूर्ण स्वदेशी उत्पादने असून, त्याचा फायदा सर्व बेल्हे गावातील व परिसरातील जनतेने घ्यावा, असे आवाहन ग्रामपंचायत सदस्या पल्लवी भंडारी यांनी केले होते.

महिला स्वयंपूर्ण व्हाव्यात यासाठी त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध केली‌ -- सरपंच बेल्हे, मनिषा डावखर                       
Previous Post Next Post