रावेर–यावल तालुक्यात सट्टा-जुगारांचा सुळसुळाट; प्रशासनावर कारवाईचा दबाव — शमीभा पाटील यांची इशारा मोहीम.. (यावल तालुका प्रतिनिधी :) फैजपूर, दि. ३० ऑक्टोबर २०२५रावेर आणि यावल तालुक्यात सट्टा, पत्ते, जुगार, मटका तसेच अवैध दारू विक्रीसारख्या बेकायदेशीर धंद्यांचे जाळे दिवसेंदिवस घट्ट होत असून, या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या निष्क्रियतेबद्दल स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शमीभा पाटील यांनी सांगितले की, “या अवैध व्यवसायांमुळे अनेक युवकांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे, तर काही लोक त्यातून भरघोस नफा कमवत आहेत.ही समाजासाठी अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे.”पाटील यांनी पुढे सांगितले की, त्यांनी स्वतः रावेर व यावल तालुक्यातील सट्टेबाज, मटका संचालक, अवैध दारू विक्रेते आणि त्यांच्या पाठीराख्यांची सविस्तर यादी तयार केली असून, ती उद्या उपविभागीय अधिकारी फैजपूर, पोलिस अधीक्षक आणि महसूल प्रशासन यांच्याकडे औपचारिकरीत्या सादर करण्यात येणार आहे.ते म्हणाले, “आता शांत बसणार नाही! या बेकायदेशीर धंद्यांना पाठीशी घालणाऱ्या कोणत्याही राजकीय, सामाजिक किंवा प्रशासकीय व्यक्तीची जबाबदारीही उघड केली जाईल.”याचबरोबर पाटील यांनी जनतेलाही आवाहन केले आहे की, आपल्या परिसरात जर सट्टा, मटका किंवा अवैध दारू विक्रीसारख्या बेकायदेशीर हालचाली सुरू असतील, तर त्या थेट प्रशासनाकडे किंवा त्यांच्या निदर्शनास आणून द्याव्यात.या इशाऱ्यानंतर स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणांवर कारवाईचा दबाव निर्माण झाला असून, पुढील काही दिवसांत या प्रकरणात हालचाली वेगाने होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0