समर्थ अभियांत्रिकीच्या ११ विद्यार्थ्यांची मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये निवड. बेल्हे दि. २९ - समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट,बेल्हे या अभियांत्रिकी महाविद्यालयातील ११ विद्यार्थ्यांची विविध मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये निवड झाल्याची माहिती अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.नवनाथ नरवडे यांनी दिली.ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या "कॅम्पस ड्राईव्ह २०२५" अंतर्गत इन्फोसिस,पार्श,फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स,पी एच एन टेक्नॉलॉजी, एल एम टी माईंड ट्री, सागर डिफेन्स या मल्टिनॅशनल कंपन्यांच्या वतीने कॉप्यूटर,आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग,इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन,इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग,मेकॅनिकल इंजिनियरिंग विद्यार्थ्यांसाठी मुलाखतीचे आयोजन नुकतेच समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट,बेल्हे या महाविद्यालयात करण्यात आले होते.'इन्फोसिस' कंपनीच्या वतीने दरवर्षी घेण्यात येणाऱ्या डायव्हर्सिटी ड्राईव्ह मध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग या विभागातील हर्षा शिंदे या विद्यार्थिनीची सिस्टीम अनालिस्ट म्हणून निवड झाली.पार्श इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीने घेण्यात आलेल्या मुलाखतीमध्ये एमबीए विभागातून रोहिणी ननावरे,दिपाली कणसे व प्रथमेश रेडे या विद्यार्थ्यांची मार्केटिंग मॅनेजर या पदाकरता निवड करण्यात आली.आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग या विभागातून यश कुटे या विद्यार्थ्याची डेटा अनालिस्ट म्हणून तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग या विभागातून चेतन शिरोळे याची सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून निवड करण्यात आली.फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स प्रा.लिमिटेड ईव्ही विभाग यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या मुलाखतीमध्ये ऑफ कॅम्पस ड्राईव्हमध्ये मेकॅनिकल इंजीनियरिंग विभागातून शिवम लामखडे तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकमुनिकेशन इंजिनियरिंग विभागातून सुजित भोगाडे यांची निवड करण्यात आली.सागर डिफेन्स या कंपनीच्या मार्फत घेण्यात आलेल्या मुलाखतीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनियरिंग विभागातून किशोर भोगाडे व दीपक दाभाडे या विद्यार्थ्यांची ट्रेनी इंजिनियर म्हणून निवड करण्यात आली.माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके म्हणाल्या की विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या कौशल्यांचा विकास करण्यासाठी ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाच्या वतीने सातत्यपूर्ण प्लेसमेंट ड्राईव्ह चे आयोजन करत असताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वेळोवेळी संधी उपलब्ध करून दिल्यामुळे रोजगाराभिमुख शिक्षणाबरोबरच स्टार्टअप ला देखील प्रोत्साहन दिले जाते.सदर मुलाखतीचे यशस्वी नियोजन करण्यासाठी ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी प्रा.सचिन पोखरकर,कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख प्रा.स्नेहा शेगर,आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग विभागप्रमुख प्रा.शुभम शेळके, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकमुनिकेशन इंजीनियरिंग विभाग प्रमुख प्रा.निर्मल कोठारी,मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा.अमोल खतोडे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा.निलेश नागरे यांनी विशेष परिश्रम घेतले.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर,सर्व संस्थांचे प्राचार्य,विभागप्रमुख व शिक्षक यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
byMEDIA POLICE TIME
-
0