ग्रामपंचायतची जुनी इमारत पाडून नवीन बांधण्याचा निर्णय, जुन्या पाऊल खुणा इतिहास जमा होणार. बेल्हे, ता. १६:- येथील जवळपास ७० ते ८० वर्षांपूर्वीची ग्रामपंचायतीची इमारत जुनी झाल्याने व गैरसोयीची ठरत असल्याने नवीन इमारत बांधण्याचा ठराव मंजूर केला गेला आणि जवळपास पुढच्या पन्नास वर्षाची दूरदृष्टी ठेवून सर्व सोयींनी युक्त अशी चार मजली इमारत बांधण्याचा निर्णय घेतला असून, संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने झाली असल्याचे, बेल्हे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी किशोर वाकडे यांनी सांगितले. यासंदर्भात गुरुवार (दि.१६ ) रोजी बेल्हे ग्रामपंचायत सभागृहामध्ये विद्यमान जुनी इमारत पाडून त्यातून निघणाऱ्या उपयोगी साहित्याचा जाहीर लिलाव करण्यात आला होता. सदर लिलावामध्ये पाच व्यक्तींनी आपला सहभाग नोंदवला होता, यावेळी लिलावाची मूळ किंमत ठरवण्यासाठी पंचायत समिती जुन्नर यांच्याकडून २ लाख ७० हजार रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. त्यामध्ये ८५ हजार रुपये इमारत पाडण्यासाठीचे गृहीत धरण्यात आले होते. त्यामुळे सर्व साहित्याची एकूण किंमत १ लाख ७० हजार रुपये अशी धरून लिलावास सुरुवात करण्यात आली होती, सदर लिलावात अंतिम बोली सुभाष जगन्नाथ पवार (रा. कळंब, ता. आंबेगाव) यांनी १ लाख ७६ हजार रुपये अशी बोली लावली व ती अंतिम ठरली आणि बेल्हे ग्रामपंचायतच्या इतिहासातील जुन्या पाऊलखुणा पुसण्याचे काम सुरू होऊन, नाविन्याकडे वाटचालीस सुरुवात झाली. (फोटो :- बेल्हे ग्रामपंचायतीची जुनी इमारत)

ग्रामपंचायतची जुनी इमारत पाडून नवीन बांधण्याचा निर्णय, जुन्या पाऊल खुणा इतिहास जमा होणार.                         
Previous Post Next Post