सोयाबीन व मका सरकारी केंद्रावरती खरेदीला सुरुवात करावी यासाठी नायब तहसीलदार मॅडम यांना निवेदन, भुसावळ तालुक्यामध्ये सोयाबीन व मका मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते ,या तालुक्यांमध्ये सोयाबीन व मका चांगल्या क्वालिटीचा असतो तरी देखील सरकारी खरेदी केंद्र मात्र उशिरा खरेदीला सुरुवात करतात, त्यामुळे खाजगी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात शोषण होते ,जर सरकारी खरेदी केंद्राने योग्य वेळेवर खरेदी चालू केली तर शेतकऱ्याचे शोषण होणार नाही, व सरकारने खरेदी केलेल्या सोयाबीन व मका धान्यावरती सरकार पैसेही कमवेल ,परंतु असे न होता कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी खुर्च्या तोडताना दिसून येतात, या निष्क्रियते मुळे शासनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे म्हणजेच एकीकडे शेतकऱ्याचे नुकसान व दुसरीकडे शासनाचे नुकसान कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिव करीत आहेत, या मनमानी कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी शेतकऱ्यांना नायब तहसीलदार मॅडम यांना निवेदन द्यावे लागले ,नायब तहसीलदार मॅडम यांना निवेदन देण्यासाठी साकेगावचे सरपंच सचिन दामू सपकाळे माजी सरपंच अनिल पुंडलिक पाटील तसेच माजी सरपंच आनंद प्रताप ठाकरे व विकास सोसायटीचे साकेगावचे चेअरमन राजेंद्र बाबुराव पाटील व भानखेड येथील कृषी मित्र सागर पाटील या क्रांतिकारी विचार श्रेणीच्या मान्यवरांनी नायब तहसीलदार मॅडम यांना सरकारी खरेदी केंद्र चालू करण्यासंदर्भात निवेदन दिले, पत्रकार अंबादास संतोष जाधव
byMEDIA POLICE TIME
-
0