शेतकरी आंदोलनाला समर्थन – समुद्रपूर येथे तहसीलदारांना निवेदन सादर. समुद्रपूर : बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला समर्थन देण्यासाठी समुद्रपूर तालुक्यातील शेतकरी बांधवांनी तहसील कार्यालयावर धडक देत निवेदन सादर केले.या आंदोलनाला गुणवंत कोठेकर यांच्या नेतृत्वात प्रवीण भाऊ उपासे , शशिकांत वैद्य , महेश झोंटींग 'अशोक वांदिले यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकऱ्यांनी एकजुटीने पाठिंबा दर्शविला.शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी लढा सुरू असताना, समुद्रपूर येथील शेतकरी बांधवांनी शासनाने शेतकऱ्यांच्या अडचणींकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली.तहसीलदारांना निवेदन देताना शेतकऱ्यांनी आपला रोष आणि अपेक्षा स्पष्टपणे मांडल्या. निवेदन देण्याकरिता गुनवंत कोठेकर , महेश झोंटीग , अजय कुडे , प्रंशात गहूकर ,राजू मानकर , सोनम मेंढे , गायत्री गांवडे ,प्रफुल्ल उसरे ,गुड्ड भगत, अजय पाणेकर , आंनद जयस्वाल ,भोला भोयर , रविन्द्र लांबट,परेश बाभुळकर, मधुकर कामडी , ईश्वर सुपारे, विजय तडस, सुरेश डांगरी , प्रविन पंनत तसेच समुद्रपुर तालुकयातील असंख्य शेतकरी बांधव उपस्थीत होते .

शेतकरी आंदोलनाला समर्थन – समुद्रपूर येथे तहसीलदारांना निवेदन सादर.                                                       
Previous Post Next Post