२७ वर्षांनी विकास विद्यालय, नांदूरपठार(ता-पारनेर) या शाळेचा सन १९९७-९८ या वर्षाच्या दहावीच्या बॅचचा स्नेह संमेलन सोहळा आनंदात साजरा झाला. (जुन्नर तालुका प्रतिनिधी संदीप शितोळे)दि. २६ ऑक्टोबर २०२५ या दिवशी आळेफाटा येथील ज्ञानेश्वरी हॉटेलमध्ये स्नेहसंमेलन सोहळा पार पडला. या कार्यक्रमासाठी त्या वर्षीचे दहावीचे सर्व विद्यार्थी व शाळेचे शिक्षक श्री. आग्रे सर व श्री. शंकर घनदाट सर उपस्थित होते. प्रथमतः गुरुवर्याचे व विद्यार्थ्यांचे स्वागत करून सर्वश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. त्यानंतर उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी आपला परिचय करून दिला व विद्यालयाचे शिक्षक श्री. आग्रे सर व श्री. शंकर घनदाट यांनी मार्गदर्शन केले व सर्वांना खळखळून हसवून शुभेच्छा दिल्या. त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याने आपले मनोगत व्यक्त करून आपल्या आजवरच्या यशाचे गमक सांगितले.श्री. बाळासाहेब आग्रे, श्री. शरद घोलप व श्री. शिवाजी आग्रे यांनी मित्र कसा असावा, जीवनातील चढ-उतार, जीवन कसे जगावे इ. विषयी महत्व पटवून दिले. तसेच श्रीदेवी पवार व मंगल राजदेव यांनी आपल्या मधुर वाणीने प्रार्थना व अभंग म्हणून दाखविला. व उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.सदर कार्यक्रमाला शरद घोलप, सुरेश देशमाने, बाळासाहेब आग्रे, हिरा झावरे, शबिना हवलदार, रुबिना हवलदार, मंगल राजदेव, सुनिता चिकणे, सविता घुले, कविता घनदाट, प्रमिला चिकणे, संगिता आग्रे, शिवाजी आग्रे, दिपक राजदेव, सुनिल घनदाट, भाऊसाहेब माने, निवृत्ती आग्रे, संतोष नवले, बारकू चिकणे, बाबाजी घोलप, किरण पानसरे, श्रीदेवी पवार, यांनी सुद्धा आपल्या शाळेतील छोट्या-मोठ्या गमती जमती सांगून सर्वांना खळखळून हसवले. कार्यक्रमात सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता. सदर कार्यक्रम सर्वांच्या कल्पनेने व सहकार्याने यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रयत्न केले गेले. सर्वांनाअसा कार्यक्रम नेहमीच घेण्यात यावा, असे वाटायलालागले. सर्वजण कार्यक्रमामुळे आनंदीत व उत्साहीत दिसत होते.शेवटी अशा प्रकारे संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीदेवी पवार व बाळासाहेब आग्रे यांनीकेले. सौ. हिरा झावरे यांनी उपस्थितांचे आभार मानले व कार्यक्रम संपला असे जाहीर केले.
byMEDIA POLICE TIME
-
0