*पाल-गारखेडा आरोग्य केंद्राच्या दुर्लक्षामुळे तडवी कुटुंबाचा चिमुरडा दगावला; वसीम भाई शेख धावले मदतीला*! (मीडीया पोलीस टाईम यावल जळगाव उपविभागीय संपादक यासीन तडवी) पाल गारखेडा येथील आरोग्य उपकेंद्रात सोयी सुविधा नसल्यामुळे अजित तडवी यांच्या नवजात बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रसूतीनंतर बाळाला श्वासाचा त्रास होत असताना, केंद्रावर ना ऑक्सिजनची सोय होती, ना वेळेवर ॲम्बुलन्स उपलब्ध झाली. प्रशासनाच्या या अक्षम्य निष्काळजी पणामुळे एका गरिबाचा चिमुरडा दगावला आहे.या घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते वसीम भाई शेख यांनी तातडीने तडवी कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी उपस्थित असलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मॅडम, सिव्हिल सर्जन आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन वायकर यांना लोकशाही मार्गाने जाब विचारला.वसीम भाई शेख म्हणाले की, "मी वारंवार आरोग्य यंत्रणा सुधारण्याची मागणी करत होतो, पण त्याकडे दुर्लक्ष झाले. अजित तडवी यांच्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आणि दोषींवर कारवाई होई पर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही." यावेळी सरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाल-गारखेडा आरोग्य केंद्राच्या दुर्लक्षामुळे तडवी कुटुंबाचा चिमुरडा दगावला; वसीम भाई शेख धावले मदतीला*!                                                                                            
Previous Post Next Post