*शेतकर्यांची फसवणूक ताडकळस पो.स्टे. मध्ये श्रीपाद ट्रेनिंग विरूध्द गून्हा दाखल*
———————————
मानवत परभणी जिल्हा विभागीय संपादक/ अनिल चव्हाण
९५२७३०३५५९-
श्रीपाद ट्रेडिंग कंपनी कडून शेतकऱ्यांची २१ लाखांची फसवणूक
ताडकळस पुलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
ताडकळस येथील श्रीपाद ट्रेडिंग कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून त्यांचा सोयाबीन व कापूस असा अंदाजे तब्बल २१ लाख १३ हजार ५२० रुपयांचा शेतमाल परस्पर विकून पैसे न दिल्याप्रकरणी ताडकळस पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी मालमत्तेची विल्हेवाट लावून रातोरात पलायन केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी विष्णु मारोतराव काळे (वय ३८, व्यवसाय शेती, रा. धानोरा काळे ता. पूर्णा जि. परभणी) यांनी ताडकळस पुलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी सुनिल भगवानराव लाकडे, गजानन भगवानराव लाकडे, भगवान रंगनाथराव लाकडे, (सर्व रा. ताडकळस ता. पूर्णा जि. परभणी) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१६, ३१६(३), ३१८, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी २५ एप्रिल २०२३ ते २१ एप्रिल २०२६ या कालावधीत श्रीपाद ट्रेडिंग कंपनी येथे फिर्यादी व इतर शेतकऱ्यांचा शेतमाल आनामत म्हणून ठेवून घेतला होता. त्यानंतर विश्वासघात करून शेतकऱ्यांना कोणतीही माहिती न देता सोयाबीन व कापूस असा माल परस्पर विकला. तसेच संबंधित शेतकऱ्यांना पैशांची परतफेड न करता आर्थिक फसवणूक केली.
याशिवाय आरोपींनी त्यांच्या मालमत्तेची विक्री करून पसार झाल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सतीश तावडे, हे करीत आहेत.

