खतांच्या तुटवड्या विरोधात देगलूरमध्ये सोमवारी 'मोंढा बंद'.

खतांच्या तुटवड्या विरोधात देगलूरमध्ये सोमवारी 'मोंढा बंद'.

पिंजारी माहेमूद 
तालुका प्रतिनिधी: देगलूर 

 देगलूर :खरीप हंगाम तोंडावर आला असताना डीएपी, युरिया आदी रासायनिक खतांचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूम ीवर खतांचा पुरवठा मुबलक प्रमाणात करावा, या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सोम वार, दि. २५ मे रोजी देगलूर येथील कृषी सेवा केंद्र व मोंढ्यातील आडत दुकाने बंद आंदोलन करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा दावा करणाऱ्या शासनाच्या काळातच अन्नदात्याला पेरणीसाठी साधी खते मिळत नाहीत, यापेक्षा दुसरे दुर्दैव नाही, अशी टीका शिवसेनेने केली आहे. खतासाठी शेतकऱ्यांना शेतीची कामे सोडून प्रचंड उन्हात तेलंगणा, आंध्र, कर्नाटक राज्यात जावे लागत असून चढ्या दराने खते खरेदी करावी लागत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. या प्रश्नी शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, आडत व्यापारी संघटना अध्यक्ष व कृषी सेवा केंद्र संघटना अध्यक्ष यांना निवेदन दिले. मागेल त्या शेतकऱ्याला त्वरित खते उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या वेळी माजी उपजिल्हाप्रमुख नागनाथ वाडेकर, शहरप्रमुख भगवान जाधव, बाबुराव मिनकीकर, युवा सेना तालुकाप्रमुख भागवत पाटील सोमुरकर, विनोद सोनकांबळे, संतोष कांबळे, सय्यद मिरभाई, गंगाधर पाटील चाकूरकर, राजू उल्लेवार, हणमंत राजुरे, संजय पाटील, दत्तात्रय बेंजलवार, शिवाजी चव्हाण, गंगाधर वकंलवार, अर्जुन लुटे, राजू जाधव, अजित पाटील, संजीव मंगरुळे, सिद्धेश्वर आयनेलवार, सायबु विभुते यांच्यासह कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Post Next Post