बाल संस्कार च्या सानवी गडे चे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत उल्लेखनीय यश
जळगाव खान्देश विभागीय संपादक प्रविण मेघे
यावल : महाराष्ट्र राज्य माध्यमिक स उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ आयोजित २०२५ - २६ च्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत
बाल संस्कार विद्या मंदिर, यावल या विद्यालयाची इयत्ता ७ वी ची विद्यार्थिनी कु. सानवी पंकज गडे हिने तृतीय क्रमांक प्राप्त करून शाळेचा, यावल शहराचा तसेच जळगाव जिल्ह्याचा मान उंचावला आहे.
कु. सानवी हिने आपल्या उत्कृष्ट वक्तृत्व कौशल्य, आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण आणि परिश्रमांच्या बळावर राज्यस्तरावर हे यश संपादन केले आहे. ती प्रा . पंकज गडे यांची मुलगी आहे . तिच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे बाल संस्कार विद्या मंदिर, यावल तसेच तिचे पालक, शिक्षकवृंद आणि सर्व यावलकर यांना अभिमान वाटत आहे.
या उज्ज्वल यशाबद्दल कु. सानवी पंकज गडे हिचे संस्थेचे अध्यक्ष महेश वाणी , मुख्याध्यापक सुनिल माळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , नातेवाईक तसेच शहरातील विविध स्तरातुन सानवी चे कौतुक होत आहे .
तिच्या पुढील शैक्षणिक, सांस्कृतिक व स्पर्धात्मक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !

