क‘’ वर्ग तीर्थक्षेत्राचा मान प्राप्त शतकाहून अधिक प्राचीन प्रभु श्रीराम मंदिराच्या जीर्णोद्धार व पुनर्बांधणी कार्याचा दिव्य शुभारंभ..!

क‘’ वर्ग तीर्थक्षेत्राचा मान प्राप्त शतकाहून अधिक प्राचीन प्रभु श्रीराम मंदिराच्या जीर्णोद्धार व पुनर्बांधणी कार्याचा दिव्य शुभारंभ..!

प्रतिनिधि, मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक 

📅 दिनांक : ९ जून २०२६
📍 स्थळ : प्राचीन प्रभु श्रीराम मंदिर, हिंगणघाट

हिंगणघाटच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाची साक्ष देणाऱ्या शतकाहून अधिक प्राचीन प्रभु श्रीराम मंदिराच्या जीर्णोद्धार व पुनर्बांधणी कार्याचे भूमिपूजन नगराध्यक्षा डॉ नयना तुड़सकर ची उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात संपन्न झाले.

माननीय कार्यसम्राट आमदार श्री. समीर भाऊ कुणावार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या ऐतिहासिक मंदिराला महाराष्ट्र शासनाकडून ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला असून, हिंगणघाटच्या धार्मिक वैभवासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. या मान्यतेमुळे मंदिर परिसराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार असून भाविकांसाठी अधिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.

प्रभु श्रीराम हे भारतीय संस्कृतीतील आदर्श, मर्यादा, कर्तव्य आणि राष्ट्रनिष्ठेचे प्रतीक आहेत. त्यामुळे मंदिरांचे संवर्धन हे केवळ वास्तूंचे पुनर्निर्माण नसून आपल्या संस्कृती, श्रद्धा आणि परंपरांच्या जतनाचे पवित्र कार्य आहे. या जीर्णोद्धारामुळे भाविकांना अधिक सुसज्ज व दिव्य वातावरणात दर्शनाचा लाभ मिळणार असून, धार्मिक पर्यटनालाही प्रोत्साहन मिळेल.
Previous Post Next Post