एसटीची अवैध वाहतुकीविरुद्ध मोहीम.
पिंजारी माहेमूद
तालुका प्रतिनिधी :देगलूर
देगलूर :महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या महसुलावर परिणाम करणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी नांदेड विभागाने धडक मोहीम सुरू केली आहे. विभागातील सर्व प्रमुख बस स्थानकांच्या २०० मीटर परिसरात नो पार्किंग प्रभावी अमलबजावणी करण्यात येत आहे. माननीय प्रताप सरनाईक साहेब परिवहन मंत्री यांच्या निर्देशनानुसार व मा.सौ प्रियंका नारनवरे पोलीस उप महानिरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मोहीम राबविण्यात येत आहे.तारीख 7 जूनपरिसरात पोलीस प्रशासनाच्या मदतीने अवैध तीन चाकी, चार चाकी व खाजगी ट्रॅव्हल्स बस प्रवासी वाहतूक करणाऱ्यावर विशेष कारवाई करण्यात आली. यावेळी सुरक्षा व दक्षता अधिकारी गोविंद मुळे, पोलीस निरीक्षक सूर्यमोहन बोलमवाड देगलूर पोलीस स्टेशन तसेच देगलूर आगाराचे आगार व्यवस्थापक संजय कुमार बालाजीराव आकूलवार, सहायक वाहतूक अधीक्षक सुनील रामचंद्र राठोड यांचे उपस्थितीत कारवाई पार पडली.एसटी प्रशासन, सुरक्षा विभाग, देगलूर पोलीस स्टेशन यांच्या समन्वयातून दिनांक ५ जून ते दि. १५ जून या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे एसटीच्या महसुलात वाढ होण्यास मदत होणार असून प्रवाशांना अधिक सुरक्षित, नियमित व अधिकृत वाहतूक सेवा उपलब्ध होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. एसटीचे उत्पन्न वाढवणे, अवैध प्रवासी वाहतुकीवर नियंत्रण आणणे आणि प्रवाशांना सुरक्षित सेवा उपलब्ध करून देणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक पोलीस व परिवहन खात्याच्या सहकायार्ने नियम भंग करणाऱ्या वर कठोर कारवाई करण्यात येईल.

