महाराष्ट्र पोलीस मनमाड शहर पोलीस स्टेशन, जि. नाशिक ग्रामीण ईमेल- ps.manmad.nr@mahapolice.gov.inफोन नंबर ०२५९१- २२२९२०. प्रेस नोटदि. ०३/१२/२०२५मनमाड उपविभागातील पोलीस स्टेशन करीता गंभीर गुन्ह्याचे तपासात भौतिक, रासायनिक,जैविक व डिजीटल पुरावे गोळा करण्याकरीता अद्यावत फॉरेन्सिक व्हॅन्स दाखलभारतीय संसदेने भारतीय न्याय संहीता २०२३, भारतीय नागरीक सुरक्षा संहीता २०२३ वभारतीय साक्ष अधिनियम २०२३ हे तीन अधिनियम दि. ०१/०७/२०२४ पासुन लागु झालेले आहे.भारतीय नागरीक सुरक्षा संहीता २०२३ चे कलम १७६ (३) अन्वये सात वर्ष किंवा त्याहुन अधिककारावासाची शिक्षा असलेला गुन्हा घडलेनंतर संबधित गुन्ह्याचे घटनास्थळी न्यायवैदयक पुरावासंकलित करण्यासाठी न्यायवैदयक तज्ञास नाशिक येथुन बोलवावे लागत होते. त्यामुळे वेळेचाअपव्यय होत होता. तसेच न्यायवैदयक पुरावे वेळेत संकलित करण्यास अडचणी निर्माण होत होत्या.भारतीय नागरीक सुरक्षा संहीता २०२३ कायद्याच्या अमंलबजावणी करीता तसेच भौतिक,रासायनिक, जैविक व डिजीटल पुरावे गोळा करण्याकरीता महाराष्ट्र राज्या एकुण २५९ मोबाईलफॉरेन्सिक व्हॅन्स प्रकल्पाचे लोकार्पण दि. २७/०१/२०२५ रोजी मा.ना. श्री. देवेंद्र फडणवीस, मुखमंत्रीमहाराष्ट्र राज्य यांचे हस्ते करण्यात आला आहे.नमुद मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन पैकी मा. पोलीस अधिक्षक मा. श्री. बाळासाहेब पाटील, अपरपोलीस अधिक्षक मा. श्री. तेगबिर सिंग संधु यांनी दि. ०२/१२/२०२५ रोजी मनमाड उपविभागाकरीताअत्याधुनिक साधन सामुग्रीसह मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन उपलब्ध करुन दिली आहे. सदर मोबाईलफॉरेन्सिक व्हॅनमध्ये भौतिक, रासायनिक, जैविक व डिजीटल पुरावे गोळा करण्याकरीता किट्स,रसायने व साधन सामुग्री उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन उपलब्धझाल्यामुळे मनमाड, नांदगाव, येवला तालुका, येवला शहर, चांदवड, वडनेर भैरव या पोलीस स्टेशनलादाखल होणाऱ्या सात वर्षापेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्याचे तपासात भौतिक, रासायनिक, जैविकव डिजीटल पुरावे गोळा करणे कामी मदत होणार आहे. नमुद मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमधील तज्ञअधिकारी हे मनमाड शहर पोलीस स्टेशन येथे त्यांचे कार्यालयात उपस्थित राहतील.
byमीडीया पोलीस टाईम
-
0