• Home
  • About Us
  • Contact Us
MEDIA POLICE TIME

MEDIA POLICE TIME

THANKS
THANKS

आज तहसील कार्यालय रावेर व शिक्षण विभाग पंचायत समिती रावेर यांच्या संयुक्त विद्यमाने पथनाट्य गृप ने वाघोड, मोरगाव, रावेर या बाजाराच्या गावांमध्ये जाऊन पथनाट्याच्या माध्यमातून मतदार जनजागृती केली

byमीडीया पोलीस टाईम -April 26, 2024
Load More
That is All

जाहिरात

MEDIA POLICE TIME

Follow Us

Popular Posts

हाता येथे अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ; चार घरे फोडून ३ ते ४ लाखांचा ऐवज लंपास ... (विशेष अकोला जिल्हा ग्रामिण प्रतिनिधी) : दि : १७ जानेवारी २०२६ .हाता गावात अज्ञात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालत एकाच रात्री चार बंद घरे फोडून मोठ्या प्रमाणात चोरी केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या चोरीत सुमारे ३ ते ४ लाख रुपये किमतीचा सोन्या-चांदीचा ऐवज व रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याचा अंदाज आहे.प्राप्त माहितीनुसार, १६ व १७ जानेवारीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी हाता गावातील रहिवासी भागातील चार घरे लक्ष्य केली. घरांचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करत कपाटे, पेट्या उचकून मौल्यवान दागिने व रोख रक्कम चोरून नेली. सकाळी घरमालकांना चोरीचा प्रकार लक्षात येताच परिसरात एकच खळबळ उडाली.घटनेची माहिती मिळताच उरळ बु पोलीस ठाणे, जि. अकोला येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून तपास सुरू करण्यात आला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.सतत वाढत चाललेल्या चोरीच्या घटनांमुळे हाता गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, रात्री पोलीस गस्त वाढवावी तसेच चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.पोलीस प्रशासनाने लवकरच चोरट्यांचा छडा लावण्याचे आश्वासन दिले आहे.रिपोर्टर : मिडीया पोलीस टाइम्स न्युज हाता .

byमीडीया पोलीस टाईम -January 17, 2026

राणी पद्मावती ग्रुप महिला टीमच्या वतीने राजपूत समाज महिला हळदी कुंकू कार्यक्रम वरणगाव फॅक्ट्री येथे उत्साहात संपन्न*. आज राणी पदमावती ग्रुप महिला टीम वरणगाव ऑ फ च्या वतीने शिव मंदिर ऑ फ वरणगाव येथे राजपूत समाजाच्या महिलांच्या वतीने सौं वैशाली ताई राजपूत यांच्या वतीने हळदी कुंकू चा कार्यक्रम घेण्यात आला प्रसंगी समाजातील मोठ्या प्रमाणात महिला उपस्तित होत्या या शुभेच्छा प्रसंगी श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्षा सौं सारिका ताई राजपूत यांची उपस्तिती लाभली त्यांनी समाजातील महिलांना एकत्रित येऊन समाज कार्यक्रम करणे संघटन करणे खूप गरजेचे आहे असे त्यावेळी सांगितले कार्यक्रम यशस्वी साठी सौं वैशाली ताई राजपूत,मीना ताई राजपूत, वर्षा ताई राजपूत,वैशाली पाटील,मंगला सोनवणे,ज्योती पाटील,मीना चौधरी,शालू राजपूत,शुभांगीपाटील आदिनी सहभाग नोंदविला व कार्यक्रम शेवटी सर्व महिलांनी स्नेह भोजनाचा आनंद घेऊन कार्यक्रमाची सांगता केली

January 18, 2026

गोरक्षेच्या नावाखाली जमावशाहीचा कहर!**_फैजपूरमध्ये मजुरावर जीवघेणा हल्ला, अल्पवयीन पुतण्या फरहानलाही लोखंडी रॉडने अमानुष मारहाण_**BNS अंतर्गत गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी*. (रावेर/शेख शरीफ)गोरक्षेच्या नावाखाली कायदा हातात घेऊन उन्माद माजवणाऱ्या टोळ्यांचे धाडस दिवसेंदिवस वाढत असतानाच फैजपूर तालुक्यातील आंदलवाडी परिसरात मानवतेला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. जलील शेख साबीर (वय 53, मजूर) व त्यांचा अल्पवयीन पुतण्या फरहान शेख (वय 17) यांच्यावर गौमांस विक्रीच्या खोट्या संशयावरून अमानुष मारहाण, जिवे मारण्याच्या धमक्या व जबरी चोरी करण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे.दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी रात्री जलील शेख हे बागोदा येथून फैजपूरकडे मोटरसायकलने जात असताना आंदलवाडी गावाबाहेर काही तरुणांनी त्यांची दुचाकी अडवली. “तू गौमांस विकतोस” असा खोटा आरोप करत शिवीगाळ सुरू करून लोखंडी फायटर व रॉडने छाती, पोट व संपूर्ण शरीरावर बेदम मारहाण करण्यात आली.मारहाणीदरम्यान “यांना जिवंत सोडू नका” अशा धमक्या देण्यात आल्या. याचवेळी आरोपींनी ₹2000 ते ₹2200 रोख रक्कम व मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून घेतला.घटनास्थळी आलेल्या स्थानिक महिलेने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तरीही हल्लेखोर थांबले नाहीत. धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांच्या उपस्थितीतही पीडिताला जबरदस्तीने मोटरसायकलवर बसवून नेत दसनूर परिसरात पुन्हा मारहाण व शिवीगाळ करण्यात आली.या अमानुष हल्ल्यात जलील शेख यांची प्रकृती गंभीर झाली. चक्कर येणे, उलट्या, अंतर्गत दुखापती वाढल्याने प्रथम रावेर व नंतर जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात आले. 19 जानेवारी रोजी डिस्चार्ज देण्यात आला असला तरी आजही तीव्र वेदना व दुखापती कायम आहेत.या प्रकरणी भूषण बाळू कोळी, सागर प्रकाश कोळी, हर्षल विजय कोळी, हर्षल ज्ञानेश्वर कोळी, गज्या रमेश, अश्विन सोपान कोळी, ओम योगेश कोळी, चेतन चंदू कोळी, कुलदीप पवार, वृषाली हॉटेलवाला (वाघोदा) तसेच 10 ते 15 अज्ञात व्यक्तींविरोधात BNS अंतर्गत गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.पीडितांच्या वतीने ही तक्रार निंभोरा पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली असून, या घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी दोषींवर कठोर कलमांखाली कारवाई करून तात्काळ अटक करावी, जमावशाहीला आळा घालावा व पीडितांना संरक्षण द्यावे, अशी जोरदार मागणी निवेदनाद्वारे पोलिस व प्रशासनाकडे करण्यात आली आहे.कायदा हातात घेणाऱ्या जमावशाहीवर पोलिसांचा कडक अंकुश कधी? असा संतप्त सवाल आता जनतेतून उपस्थित केला जात आहे.

January 21, 2026

*"नकीर खान: वोटों के गणित में पिछड़े, पर जनता के दिल में सबसे आगे!"*. अकोला:सियासत में अक्सर जीत का जश्न मनाया जाता है और हारने वाले भुला दिए जाते हैं। लेकिन अकोला महानगर पालिका चुनाव 2026 के प्रभाग क्रमांक 11 के नतीजों ने एक नई इबारत लिख दी है। यहाँ भले ही सर्टिफिकेट किसी और के हाथ में गया हो, लेकिन चर्चाओं के केंद्र में सिर्फ एक ही नाम है— नकीर खान।कांटे का मुकाबला, सम्मान की जंगअजित पवार के नेतृत्व वाली राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के उम्मीदवार नकीर खान ने इस बार ऐसा चुनाव लड़ा जिसकी गूँज पूरे शहर में सुनाई दी। चुनावी पंडितों की मानें तो नकीर खान ने वोटों के गणित को जिस तरह चुनौती दी, उसने बड़े-बड़े दिग्गजों की नींद उड़ा दी थी। वह कुछ ही वोटों के मामूली अंतर से पिछड़ गए, लेकिन यह हार उन्हें कमजोर करने के बजाय और भी मजबूत नेता बनाकर उभरी है।जनता का अटूट विश्वासजनता के बीच ऐसे नेता की छवि है जो हमेशा मदद के लिए खड़ा रहता है। चुनाव परिणामों के बाद क्षेत्र के लोगों का कहना है कि "हमने अपना प्रतिनिधि नहीं, बल्कि अपना भाई और बेटा चुना था, और हमारे लिए वे आज भी विजेता हैं।" यही वह 'सच्ची कमाई' है जिसे कोई भी चुनावी परिणाम कम नहीं कर सकता।'बाजीगर' की तरह स्वीकार की हारचुनाव नतीजों के बाद जिस परिपक्वता का परिचय दिया, उसने विरोधियों का भी दिल जीत लिया। उन्होंने हार का ठीकरा किसी पर फोड़ने के बजाय जनता के प्यार को सर-आंखों पर रखा। सोशल मीडिया पर समर्थकों ने सही ही लिखा है— 'हारकर जीतने वाले को बाजीगर कहते हैं।'"चुनाव तो एक प्रक्रिया है, मेरा असली मकसद जनता की खिदमत करना है। हर नागरिक का शुक्रिया जिन्होंने मुझ पर भरोसा जताया। वादा करता हूँ कि पद रहे न रहे, संघर्ष और सेवा आपके लिए हमेशा जारी रहेगी।"

January 18, 2026

*बाळापुरचा अभिमान शिखरावर! श्रीनिवास बासरोड CRPF, लोकेश पलीकोंडावार CISF आणि राहुल घाटे BSF यांची भारतीय सैन्यात निवड*. (धर्माबाद (प्रतिनिधी: गजानन वाघमारे)बाळापुर गावाने अभिमानाचा नवा शिखर गाठला आहे. गावाचे तीन धैर्यशील आणि मेहनती तरुण – श्रीनिवास बासरोड (CRPF), लोकेश पलीकोंडावार (CISF) आणि राहुल घाटे (BSF) – त्यांच्या अपार जिद्द, मेहनत आणि ठाम इच्छाशक्तीच्या जोरावर भारतीय सैन्यात निवडले गेले आहेत.ही निवड केवळ त्यांच्या वैयक्तिक यशाचे प्रतीक नाही, तर त्यांच्या कठीण परिस्थितीतून त्यांनी दाखवलेला धैर्य आणि आत्मविश्वास आहे. या तरुणांचे आई-वडील आर्थिक दृष्ट्या हलाखीत असून, घर चालवण्यासाठी मोलमजुरी करत होते. अशा परिस्थितीतही या तरुणांनी शिक्षण सोडले नाही; मेहनत, कष्ट आणि धैर्याने त्यांनी आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवस-रात्र प्रयत्न केले.श्रीनिवास बासरोड यांनी CRPF मध्ये निवड मिळवून देशाच्या सुरक्षेसाठी आपली जबाबदारी स्वीकारली, लोकेश पलीकोंडावार यांनी CISF मध्ये प्रवेश करून देशसेवेची शपथ घेतली, तर राहुल घाटे BSF मध्ये निवडून आपल्या सीमांचे रक्षण करण्यासाठी सज्ज झाला.गावकऱ्यानी या तरुणांच्या यशावर प्रचंड आनंद व्यक्त केला असून, हे यश संपूर्ण बाळापुरसाठी प्रेरणादायी ठरले आहे. त्यांच्या मेहनत, जिद्द, धैर्य आणि कुटुंबीयांच्या अपार संघर्षामुळे त्यांनी दाखवलेला आदर्श गावातील प्रत्येक तरुणासाठी मार्गदर्शन ठरेल.गावातील शिक्षक, मित्रपरिवार आणि कुटुंबीय त्यांच्या यशावर अभिमान व्यक्त करत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांमुळे बाळापुरच्या युवकांना कठोर मेहनत, शिक्षणाचे महत्त्व आणि धैर्याने अडचणींवर मात करण्याची प्रेरणा मिळाली आहे.या तीन तरुणांच्या यशामुळे बाळापुर गावाचा गौरव राज्यस्तरावर पोहोचला असून, बाळापुरचा अभिमान शिखरावर पोहोचला आहे. त्यांच्या संघर्षमय जीवनकथेतून हे स्पष्ट होते की, निर्धार, मेहनत आणि धैर्य असल्यास कोणतीही परिस्थिती अडथळा ठरू शकत नाही.

January 20, 2026

⏭️पो.स्टे:- हिंगणघाट जि. वर्धा ⏭️ अप.क्र. - 0058/2026 ⏭️कलम 8(क),20(b),(ii),(अ) एन.डी.पि.एस. अॅक्ट 1985 ⏭️ आरोपी - प्रज्योत विरसेन थुल वय 23 वर्ष रा. संत चोखोबा वार्ड़ हिंगणघाट ⏭️ घटनास्थळ - शहालगंडी मंदीर रोड़ हिंगणघाट⏭️ घटना ता. वेळ दि. 20/01/2026 23.10 वा. दरम्यान⏭️हकिकत:- सविनय सादर आहे की, नमुद घ.ता.वेळी व स्थळी यातील फिर्यादी हे पोलीस स्टॉफ सह पोस्टे हिंगणघाट परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या विष्वासनिय खबरेवरून पंच व मापारी यांना कार्यवाही करणे करीता हजर राहणेबाबत सुचनापत्र दिल्यावरून ते हजर आल्यावर पंच व पोस्टॉफ सह रवाना होवून षहालगंडी मंदीर रोड कडे जाणारे रोड येथे यातील नमुद आरोपीवर सापळा रचुन नाकेबंदी करून सदर आरोपीचे वाहन बाजुला घेवून त्यांची व वाहनांची कायदेषीर रित्या पाहणी घेतली असता त्याचे अंगझडतीमध्ये 1) एका पन्नीमध्ये हिरवट काळपट रंगाची पाने, फुले, देठ, कळया व बिया असलेली ओलसर वनस्पती गांजा नावाचा अंमली पदार्थ भरून त्याचे एकुण वजन 177 ग्रॅम प्लॅस्टीक पन्नी वजन - 2 ग्रॅम निव्वळ गांजा अंमली पदार्थाचे वजन - 175 ग्रम (गांजा प्रति किलो 20,000 रू प्रमाणे) 3,500 रू 2) जुनी वापरती एक जुनी वापरती निळया रंगाची स्प्लेन्डर प्लस मोटार सायकल क्र. एमएच 32 एएक्स 4066 जिचा चेचीस क्र. MBLHA10ASDHF88175 असा असुन असा किं. 60,000 रू असा जु.किं. 63,500 /- रू चा माल मिळून आल्याने जप्ती पंचनामा कार्यवाही करण्यात आली. अष्या फिर्यादीचे लेखी तहरीर वरून सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला असून सदर कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल साहेब, मा.अप्पर पोलीस अधीक्षक सदाशीव वाघमारे साहेब, मा. प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी भटकर सा. व पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांचे आदेशाने पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील सपोनि पद्ममाकर मुंडे व सपोनि अतुल स्तूल यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात डि.बी. पथक पोलीस हवालदार पोहवा प्रशांत ठोंबरे पो.ना राजेश शेंडे, पोशी आशिष नेवारे,पो.शि. मंगेश वाघमारे, पोशी रोहीत साठे यांनी केली. सदर गुन्हयांचा पुढील हिंगणघाट पोलीस करीत आहे..मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक

January 21, 2026

बडूर येथील मातंग समाजाचा बिलोली, तहसील कार्यालयावर आमरण उपोषण. (मारोती एडकेवार जिल्हा/ प्रतिनिधी नांदेड )नांदेड: बिलोली तालुक्यातील बडूर गावात क्रांतीसुर्य साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या नियोजित पुतळ्यासाठी आरक्षित ठेवलेल्या जागेवर अतिक्रमण करण्यात आल्याच्या विरोधात,बडूर येथील मातंग समाजाचा तिर्व संताप व्यक्त होत आहे,केवळबाई गंगाराम दावलेकर या महिलेने सदर अतिक्रमण केलेला आहे, असे मातंग समाजाकडून आरोप होतं आहे सदर महिलेला अनेक वेळा अतिक्रमण काढून घ्यावे अशी विनंती केली असता,समाज बांधवांना घाण शब्द भाषा वापरत, त्यांच्यावर कुठे गुन्हे दाखल करण्याचे षडयंत्र राबवली आहे, व गावातील काही जातीयवादी उच्चवर्णी लोक या महिलेला साथ देण्याचे कार्य सुरू करत असल्याची,माहिती उपोषणकर्ते यांनी दिलेली आहे डॉ. आण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याचे, नियोजित जागा काबीज करून स्वतः त्या ठिकाणी, घर बांधण्याचे बांधकाम सुरुवात केली आहे यामुळे, गावातील वातावरण अधिक तणावपूर्ण आहे सदर महिलेची वर्तणूक आणि आक्रमक भूमिका पाहता अतिक्रमणाच्या,विरोधात असलेल्या गावातील बहुसंख्य मातंग समाज पुरुष व महिलांनी एकत्र येत, आंदोलनाचा निर्णय घेतला अखेर 22 जानेवारी रोजी मा.जिल्हाधिकारी नांदेड, मा उपाधिकारी साहेब,अधिकारी बिलोली तहसीलदार साहेब, गटविकास अधिकारी,तसेच पोलीस निरीक्षक बिलोली, यांना निवेदन देत संबधीत महिलेवर तात्काळ करावी,यासाठी तहसील बिलोली कार्यावर आमरण उपोषण करण्यात येत आहे,उपोषण कर्ते, पिराजी लालबा दावलेकर, राम जळबा भंडारे, गंगाराम माणिक दावलेकर, चंदु गोविंद सोमवारे, मारोती गोविंदराव जाधव, मागण्या, डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या जागेवरती केलेली अतिक्रमण हटवण्यात यावे, अनाधिकृत जागेवरील विनापरवाना करीत असलेले बांधकाम थांबविणे, अवैधरीत्या चोरून मुरूम आणल्याप्रकरणी गुन्हे दाखल करावा, सदर महिला गावाचे शांतता व एक्यता धोक्यात असल्या प्रकरणी तात्काळ प्रतिबंधक करावा, स्वतः 420 असून या विरोधात लढणाऱ्या पुरुषावर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी धमकी देत असल्याने तिच्यावर तात्काळ कारवाई करावी, या प्रकरणात सदर महिलेवर तात्काळ कारवाई करून मातंग समाजाला न्याय मिळवून द्यावा याबाबतीत प्रशासनाने, गांभीर्यपूर्वक दखल घेऊन त्या महिलेवर ती कारवाई करावी,अन्यथा मातंग समाज पूर्ण महाराष्ट्र मध्ये रस्तावर उतरल्याशिवाय राहणार नाही असे मातंग समाजामधून त्रिव व संताप व्यक्त करण्यात येत आहे.

January 23, 2026

*महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे जिल्हा अधिवेशन दिनांक 16 जानेवारी 2026 ला उत्साहात संपन्न*. कंत्राटदार विरहित रोजगार व समान काम समान वेतनाचे ठराव एकमताने मंजुर.@ मुरलीधर माजरीकर यांची वर्धा जिल्हाध्यक्षपदी निवड.महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) यांचे वर्धा जिल्हा अधिवेशन अत्यंत उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात यशस्वीरीत्या पार पडले. अधिवेशनाची सुरूवात प्रतिमापूजन, श्रमिक गीत व "भारतीय मजदूर संघ जिंदाबाद" या जोशपूर्ण घोषणांनी करण्यात आली. सर्व मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक सादर करण्यात आले. या अधिवेशनास उद्घाटक स्थानी मा. श्री. शंकरराव पहाडे साहेब महामंत्री सेवा निवृत्त जेष्ठ नागरिक संघ महाराष्ट्र प्रदेश व कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी मा. श्री. निलेशजी खरात साहेब प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ हे लाभले. उपस्थित सर्व मान्यवरांनी कामगारांना मार्गदर्शन केले. अधिवेशनात संघटनेचे प्रदेश अध्यक्ष मा. श्री. निलेशजी खरात यांनी मार्गदर्शन करतांना कंत्राटी कामगारांना नोकरीत स्थैर्य, कंत्राटदार विरहीत रोजगार व समान काम समान वेतन मिळावे यासाठी आग्रही असल्याचे स्पष्ट केले. या मागण्यांसाठी कायदेशीर लढा तसेच आवश्यक असल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील कामगारांनी सज्ज राहावे, असे आवाहन त्यांनी केले. अधिवेशनात जिल्ह्यातील कंत्राटी कामगारांच्या गंभीर समस्या, अडचणी व त्यावरील ठोस उपाययोजनांवर सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली. जिल्ह्यातील संघटनात्मक स्थिती, सदस्य नोंदणी व वर्गणी, सुरू असलेली न्यायालयीन प्रकरणे तसेच देणगी बाबत काटेकोर व पारदर्शक अंमलबजावणी करण्याचा ठाम निर्णय अधिवेशनात घेण्यात आला. प्रमुख वक्त्यांनी मार्गदर्शन करतांना वीज क्षेत्रातील कंत्राटी कामगारांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध संघटित व तीव्र लढा उभारण्याचे आवाहन केले. भारतीय मजदूर संघाच्या विचारधारेनुसार संघटन, संघर्ष व संवाद या मार्गाने कामगारांचे प्रश्न सोडविले जातील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांसाठी चहा व भोजनाची व्यवस्था करण्यात आली. या अधिवेशन प्रसंगी मुरलीधर माजरीकर, राहुल बोडसे, हेमंत वडे, प्रणव पोकळे, निलेश डवरे यांच्यासह जिल्ह्यातील विविध तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या अधिवेशनास 150 पेक्षा अधिक कंत्राटी वीज कामगारांची लक्षणीय उपस्थिती होती.

January 18, 2026

आज वीर शिरोमणी हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह यांच्या 429 व्या पुण्यतिथी निमित्त आज भडगाव येथे फलक पूजन करून साजरी करण्यात आली. यावेळी भडगाव नगर परिषदेचे नगरअध्यक्ष मा. जहांगीरभाऊ मालचे व नगरसेवक पप्पू दादा व शरदभाऊ हिरे लोकमत पेपर तालुका अध्यक्ष अशोक परदेशी , आनंदसिंग राजपूत , ज्ञानेश्वर राजपूत,बन्सीभाऊ परदेशी, नरेंद्रसिंग सुर्यवंशी,करणी सेना भडगाव तालुका उपाध्यक्ष सुनील राजपूत,मुन्ना भाऊ परदेशी,जयेश राजपूत, नवल राजपूत,स्वप्नील परदेशी, मिलिंद परदेशी, महेंद्र राजपूत, सरदार राजपूत,चेतन परिहार, सुवर्णसिंग राजपूत,शरद राजपूत, बालाभाऊ, परेश राजपूत,स्वप्नील राजपूत, जितेंद्र राजपूत, आकाश राजपूत,नाना पाटील, विशाल परदेशी, नितीन पाटील यांच्या सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यांच्या उपस्थिती करणी सेना दिनदर्शिका वाटप करण्यात आले 👏👏👏🚩🚩

January 19, 2026

चोपडा नगरपालिका सभापतींची निवड बिनविरोध.. (चोपडा दि.१९( संजीव शिरसाठ)चोपडा नगरपरिषदेच्या स्थायी व विषय समित्यांची सभापती पदांची निवड पीठासन अधिकारी तथा तहसीलदार भाऊसाहेब राऊत यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच होऊन स्थायी समिती सभापतीपदी नगराध्यक्ष सौ नम्रता सचिन पाटील यांची तर बांधकाम समिती सभापती पदी हुसेन खाँ अय्युब खॉं पठाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे तसेच इतर समिती सभापतींची ही निवड घोषित करण्यात आली आहे. नगरपालिका सभागृहात सकाळी 11 वाजता पीठासन अधिकारी तहसीलदार भाऊसाहेब राऊत यांच्या कडे स्थायी व विशेष समिती सभापतींचे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले. त्यानंतर प्रत्येकी एकच आल्याने बिनविरोध स्थायी समिती सभापतीपदी सौ नम्रता ताई सचिन पाटील तर बांधकाम सभापतीपदी हुसेन खाँ अय्युब खॉं पठाण, शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापती पदी अमोल साहेबराव पाटील, स्वच्छता वैद्यक आणि आरोग्य समिती सभापतीपदी रमेश ग्यानोबा शिंदे, पाणीपुरवठा व जल निस्सारण समिती सभापतीपदी किशोर रघुनाथ चौधरी, नियोजन व विकास समिती सभापतीपदी उपनगराध्यक्ष पंकज सुरेश बोरोले आणि महिला व बालकल्याण समिती सभापती पदी सौ. देवयानी पवन माळी यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी सौ नम्रता सचिन पाटील उपाध्यक्ष पंकज सुरेश बोरोले गटनेता योगेश उर्फ पियुष राजेंद्र चौधरी,गटनेते रमाकांत नथू ठाकूर,गटनेते गजेंद्र अरविंद जैस्वाल,गटनेते हितेंद्र रमेश देशमुख यांच्यासह 34 सदस्य हजर होते. तसेच मुख्याधिकारी रामनिवास झवंर, उप मुख्याधिकारी संजय मिसर, सभा अधीक्षक संजय ढमाळ, अनिल चौधरी तसेच सर्व विभाग प्रमुख व नगरसेवक मोठ्या संख्येने हजर होते.

January 19, 2026

Main Tags

  • THANKS (1)
  • धन्यवाद (2)
  • धन्यवाद..... (1)

Labels

  • THANKS (1)
  • धन्यवाद (2)
  • धन्यवाद..... (1)
  • Home
MEDIA POLICE TIME

MEDIA CRIME TIME

MEDIA POLICE TIME NETWORK च्या Digital वेब पोर्टल चा शुभारंभ जळगाव जिल्हा, रावेर तालुका, ( महाराष्ट्र ) येथे करण्यात आला असुन.राज्यात आज अनेक संकेतस्थळाच्या माध्यमातून वृत्त देण्याचा प्रयत्न केला जात आहे. महाराष्ट्रातील चालू घडामोडी , गुन्हे , तसेच सांस्कृतीक, शैक्षणिक घडामोडी, चालु घडामोडी, शेती विषयक आणि प्रशासकीय बातम्या या पोर्टल च्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात येणार आहे पोर्टलची एम.एस.एम.ई. अंतर्गत नोंदणी करण्यात आली आहे Ragistrestin No : UDYAM-MH-14-0033356
मुख्य संपादक तथा संचालक हमीद इस्माईल तडवी मोबा- +91 90963 03283 या न्यूज पोर्टलला ज्या बातम्या येतात त्या प्रतिनिधी मार्फत येत असल्यामुळे प्रकाशित झालेल्या बातमी शी मुख्य संपादक सहमत असतीलच असे नाही
कोणतेही कायदेशीर न्याय क्षेत्र रावेर

Design by Theme Developer | Distributed by Blogger Templates
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • RTL Version