भाकप तर्फे स्मार्ट मीटर विरोधात तीव्र निदर्शने ! 7 जानेवारी 2026 बुधवार रोजी पुन्हा निदर्शने करणार ! (छत्रपति संभाजी नगर (औरंगाबाद ) बुधवार दि . 3 डिसेंबर 2025 ; भारतीय कम्युनिस्ट पक्षाने महावितरण जुबली पार्क कार्यालयासमोर स्मार्ट मीटर व वीज दरवाढी विरोधात तीव्र निदर्शने केली. दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी दर्शना केली जातात. ठरल्याप्रमाणे आज जुबली पार्क येथे महावितरण कार्यालयासमोर जोरदार निदर्शने झाली. याबाबत असे की, स्मार्ट मीटरशी सरकारचा काही संबंध नाही अशा प्रकारचा संभ्रम काही लोक मुद्दामहून निर्माण करीत होते. 14 ऑक्टोबर 2025 रोजी महावितरणचे मुख्य अभियंता यांनी भाकपला पाठविलेल्या पत्रामध्ये केंद्र व राज्य सरकारच्या आदेशाप्रमाणे स्मार्ट मीटर हे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केल्याने संभ्रमाला व चर्चेला पूर्णविराम मिळालेला आहे. कोणत्याही परिस्थितीत जनतेला स्मार्ट मीटर व वीज दरवाढ नको असल्याने भारतीय कम्युनिस्ट पक्ष या विरोधात आंदोलन सुरूच ठेवेल असा निर्धार आजच्या निदर्शनाच्या वेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी स्मार्ट मीटर लावल्यानंतर अचानक वीज बिलामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली विज बिल घेऊन अनेक नागरिक या निदर्शनात सहभागी झाली . स्मार्ट मीटरमुळे वीज बिलाच्या तक्रारी वाढल्या आहेत. असेही यावेळी निदर्शनास आले. वस्तूतः स्मार्ट मीटर पाकिस्तान मधून आलेले आतंकवादी लावून परत पाकिस्तानला पळून जात नाहीत. तर भाजपा सरकारच्या आदेशाने दिलेल्या कंत्राटाद्वारे अदानी ,मोंटे कार्लो ,एनसीसी या भारतीय कंपन्या सरकारच्या परवानगीने लावत आहेत. त्यामुळे भोळ्या जनतेने स्वतःची फसवणूक करून न घेता स्मार्ट मीटर हे महाराष्ट्र व केंद्र सरकारच्या आदेशानेच लावले जात आहे. यापूर्वीही आंदोलकांनी स्पष्ट केले होते. लोकांचा विरोध असतांना जबरदस्ती व गुपचूप स्मार्ट मीटर लावू नका या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने सह व्यवस्थापकीय संचालक महावितरण जुबली पार्क , कार्यालयासमोर निदर्शने केली. स्मार्ट मीटर लावले जाणार नाहीत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले असले तरी प्रत्यक्षात मात्र गुपचूप व जबरदस्तीने स्मार्ट मीटर लावण्याचा धडाका महावितरण ने लावला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या खोटारडेपणाचा निषेधही या निदर्शनात करण्यात आला. ठिकठिकाणी स्मार्ट मीटर ला विरोध होत असतानाही जबरदस्तीने स्मार्ट मीटर लावले जात आहेत. अनेक ठिकाणी लोक स्मार्ट मीटर लावणाऱ्या कंपनीच्या लोकांना हाकलून देत आहेत. भारतीय कम्युनिस्ट पक्षाने ठरविल्याप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी सकाळी 10 वाजता निदर्शने केली जात आहेत. एनसीसी कंपनीचे कंत्राट रद्द करावे , जबरदस्ती व गुपचूप लावलेले स्मार्ट मीटर तत्काळ काढून घ्यावे व त्या ठिकाणी जुने मीटर लावावे यावेळी इतर मागण्यांचे निवेदन देण्यात आले.त्यावेळी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. पुन्हा दि. 7 जानेवारी 2026 बुधवार रोजी सकाळी 10 वाजता पुन्हा निदर्शने करण्यात येतील असाही निर्णय घेण्यात आला. स्मार्ट मीटर व वीस दरवाढी विरोधात आंदोलनात येणे किंवा लाखो रुपयांचे वीज बिल भरणे यापैकी एक पर्याय लोकांना निवडावा लागणार आहे त्यामुळे पहिला पर्यायच लोकांनी निवडून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी सकाळी दहा वाजता जुबली पार्क येथील कार्यालयासमोर निदर्शनात सहभागी व्हावे असे आवाहन भाकपाने केले आहे निवेदनात १ ) छत्रपती संभाजीनगरच्या कैलासनगर , दादा कॉलनी , शंभू नगर , भावसिंगपूरा, वाळूज , एकता नगर, बीड बायपास व शहरातील इतर भागात गुपचुप व जबरदस्तीने लावलेले स्मार्ट मिटर तातडीने काढून घ्या व पूर्वीचे जुने मिटर तात्काळ लावा , २ ) छत्रपती संभाजीनगरच्या लोकांची परवानगी नसतांना चलाखी करुन , गुपचुप तसेच अनेकांचे फॉल्टी मिटर नसतांना फॉल्टी मिटरच्या नावाखाली जुने मिटर घेवुन जायचे आणि बदमाशीने स्मार्ट मिटर लावायचे तसेच नविन कनेक्शन देत असतांनाही जबरदस्तीने जुन्या पध्दतीचे मिटर नाहीत असे सांगुन स्मार्ट मिटरच घ्यावे लागेले अशी हुकुमशाही , जबरदस्ती करुन स्मार्ट मिटर जनतेला लुटण्यासाठी लावायचे हा प्रकार थांबला पाहीजे व ज्या ठिकाणी अशा पध्दतीने स्मार्ट मिटर लावले आहेत ते तातडीने काढुन घेतले पाहीजे . ३ ) छत्रपती संभाजीनगरच्या सरकारी कार्यालये व सरकारी निवासस्थानावर लावलेले स्मार्ट मिटरही तातडीने काढुन घेतले पाहीजे . ४ ) टीओडी पध्दतीची वीज नियामक आयोगांनी केस नंबर २१७ / २०२४ अंतर्गत मंजूर केलेली छुपी व प्रचंड प्रमाणातील वीज दरवाढ कायमची रद्द करा . ५ ) एप्रिल २०२४ च्या वीजदरापेक्षाही अर्ध्यापेक्षा कमी वीज दर करा . ६ ) मराठवाडयावर अन्याय करणारी छत्रपती संभाजीनगरची भेदभाव पूर्ण लोड शेडींग बंद करा . ७ ) सेक्यूरिटी डिपॉझीटच्या नावाने करत असलेली लूट बंद करा8) स्मार्ट मीटरचे कंत्राट रद्द करा.9) स्मार्ट मीटर विजेच्या धक्क्यामुळे जखमी आचल अस्वले वय आठ वर्ष हीच एक कोटी रुपये नुकसान भरपाई द्या.या मागण्यांचा समावेश आहे . . याबाबत विविध पक्ष संघटनांची कृती समिती करून कार्यकर्त्यांची कार्यशाळा घेण्याचाही निर्णय घेण्यात आला. यावेळी भाकप राज्य कौन्सिल सदस्य व शहर सेक्रेटरी ॲड . अभय टाकसाळ , शेख अमजद शेख पाशु, शेख एजाज , मधुकर गायकवाड, राजू हिवराळे, , जफर खान फजलू रहमान खान , वसीम खान सिकंदर खान, , रफिक बक्ष , आशिष गायकवाड , समाधान पारधे, आतिश दांडगे, आतिक शेख अहमद , शिवाजी हरिश्चंद्ररे , सुरेश परदेशी, आशिष गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
byमीडीया पोलीस टाईम
-
0