देगलूर महाविद्यालयात 'सलग १८ तास अभ्यास' उपक्रम.
पिंजारी माहेमूद
तालुका प्रतिनिधी: देगलूर
देगलूर अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालय देगलूर ग्रंथालय विभाग व श्री समर्थ वाचनालय देगलूर यांच्या संयुक्त विद्यमाने (एम ओ यु अंतर्गत) आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 'सलग १८ तास अभ्यास' या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे ०५:०० ते रात्री ११.०० या वेळेत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन श्री सूर्यकांत नारलावार (अध्यक्ष, श्री सम र्थ वाचनालय देगलूर तथा कार्यकारी सदस्य अडत व्यापारी शिक्षण संस्था देगलूर) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री देवेंद्र मोतेवार कोषाध्यक्ष,श्री समर्थ वाचनालय देगलूर, तथा कार्यकारिणी सदस्य अडत व्यापारी शिक्षण संस्था देगलूर) महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, डॉ. संजय पाटील, उपप्राचार्य डॉ. पटेल एम एम, उपप्राचार्य डॉ व्ही
जी शेरीकर, ग्रंथपाल डॉ. साईनाथ शिंदे, डॉ. बालाजी कत्तूरवार, डॉ. विनय भोगले, डॉ. राजेश्वर दुडुकनाळे,, प्रा. गुरुडे एस बी, प्रा. लागले टी एन, प्रा. दत्ता पाटील, प्रा. घुडुसाब, सहाय्यक ग्रंथपाल श्रीनिवास नाईक, श्री समर्थ
वाचनालयाचे ग्रंथपाल कदम पुंडलिक ग्रंथालय लिपिक, भीम कर्णे, कनिष्ठ लिपिक दीपक संगमकर, श्रीमती इळेगावकर रेखा, श्रीमती गोविंदवार जी पी, महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. सहभागी विद्यार्थ्यांना सकाळी चहा नाश्ता व दुपारी अल्पोपहार आणि सायंकाळी चहाची व्यवस्था करण्यात आली या उपक्रमात एकूण ४५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन सलग १८ तास अभ्यास करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

