श्रीराम नवमीनिमित्त नागरी सुविधा पुरवण्याची रामभक्तांची मागणी...* *श्रीराम नवमीनिमित्त नागरी सुविधा पुरवण्याची रामभक्तांची मागणी...* मालेगाव शहरातील रामभक्त बांधवांनी श्रीराम नवमी उत्सव समिती, मालेगावच्या वतीने महानगर पालिकेचे आयुक्त रवींद्र जाधव व अप्पर पोलीस अधीक्षक तेघवीर सिंग संधू यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन सादर करून श्रीराम नवमी उत्सवाबाबत विविध मागण्यासाठी सोयी सुविधा पुरवण्याची मागणी केली.श्रीराम नवमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक मार्गावर स्वच्छता करून सुशोभीकरण करण्याबरोबर अतिक्रमण काढण्यात यावे व रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी करण्यात यावी आणि श्रीराम जन्मोत्सवातील श्रीराम मूर्ती 18 फूट उंच असल्याने मिरवणूक मार्गावरील झाडांच्या फांद्याची छाटणी करून रस्त्यावरील इलेक्ट्रिक वायरिंग दूर करून मुबलक प्रकाशाची व्यवस्था करण्यात यावी व शोभायात्रा मिरवणुकीला उपस्थित असलेल्या रामभक्तांसाठी महानगरपालिकेतर्फे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून आपत्कालीन परिस्थितीमध्ये रुग्णवाहिका व अग्निशामक दलाची व्यवस्था करण्यात यावी. अशा स्वरूपाच्या मागण्या करत श्रीराम नवमीच्या दिवशी मालेगाव शहरातील कत्तलखाने व मद्यविक्री दुकाने देखील बंद ठेवण्याबाबत सांगण्यात आले. श्रीराम नवमी उत्सवाच्या मालेगाव कॅम्प भागातून रामसेतू पुलापर्यंत नियोजित मिरवणूक मार्गावर मिरवणुकीच्या प्रसंगी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. यामुळे मिरवणूक विस्कळीत होऊन नागरिकांची गैरसोय होते. हे टाळण्यासाठी मोसम पूल सह मोची कॉर्नर, राष्ट्रीय एकात्मता चौक, महात्मा फुले रोड व रामसेतू पुल या ठिकाणी पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन मागणी करण्यात आली.याप्रसंगी रामदास बोरसे, हरिप्रसाद गुप्ता, अजय वाघ, दीपक बच्छाव, सारंग बोरसे, मच्छिंद्र शिर्के, दिनेश सोनजे, विनोद निकम, शुभम पवार, निकेतन प्रमाणे आदी उपस्थित होते. श्रीराम नवमीनिमित्त नागरी सुविधा पुरवण्याची रामभक्तांची मागणी...*… byमीडीया पोलीस टाईम -March 19, 2026