रफिक नामदार तडवी चालक वाहक यांचा नाशिक येथे गौरव पुरस्कार
शकील तडवी: यावल जळगाव उपविभागीय उपसंपादक
नाशिक येथे एसटी महामंडळाच्या 78 व्या वर्धापन दिनानिमित्त लाल परी गौरव रत्न पुरस्कार यावल सह आगार मधील कर्मचाऱ्यांचा गौरव पुरस्कार जळगाव जिल्ह्यातील एरंडोल आगार चाळीसगाव आगार यावल आगार रावेर चोपडा अमळनेर पाचोरा एस टी महामंडळाचे जळगाव जिल्ह्यातील 11 जणांचे लाल परी गौरव रत्न पुरस्कार नाशिक येथे एक जून रोजी करण्यात येणार आहे.उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आणि रुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बस स्थानक अ वर्गातील चोपडा बस स्थानकाचे आगार प्रमुख यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. तर लाल परी गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे पुरस्कार मिळणारे पुढीलप्रमाणे यावल येथील श्री रफिक नामदार तडवी चालक क्रमाक 10220 यावल आगर आणि श्री नबाब छबु तडवी वाहक क्रमांक 26765यावल आगार श्री शैलेंद्र प्रकाश जाधव वाहक क्रमांक 34622 जळगाव आगार, श्री मती पुनम वैभव सूर्यवंशी वाहक क्रमाक 35362चाळीसगाव आगर , श्री सुनील शामराव सोनवणे आर्ट ए चोपडा आणि श्री राहुल देविदास बाविस्कर वाहक क्रमांक 34510 चोपडा श्री मती मनीषा छगन पाटील वाहक क्रमाक 32662 एरंडोल श्री सुखदेव भीमराव पारधी वाहक क्रमाक 29498 अमळनेर, संदीप गोकुळ मेंढे चालक तथा वाहक 87602/66016रावेर आगार श्री सलमान मेहबूब तडवी वाहक क्रमांक 1611 रावेर डेपो आणि श्री अरविंद मिठू जाधव वाहक 42637 पाचोरा, अशा 11 चालक आणि वाहक यांचा उत्कृष्ट कामगिरी बाबत नाशिक येथील रा,प, मेळा बस स्थानक नाशिक विभाग येथे एक जून रोजी सकाळी दहा वाजता सत्कार करण्यात येणार आहे. याबाबतचे लेखी पत्र संबंधित आगार प्रमुखांना पाठवण्यात आलेले आहे, तर चोपडा येथील आगार प्रमुख श्री महेंद्र लोटन पाटील यांचा उत्कृष्ट आगार प्रमुख अ वर्ग म्हणून विशेष सत्कार करण्यात येणार आहे. सर्व नाशिक विभागातील आगार प्रमुखांमधील वरील सर्व कर्मचाऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन नाशिक विभागीय अधिकारी यांनी केले आहे

