सिरसखोड मार्गाची दुरवस्था; विद्यार्थी व शेतकरी हैराण धर्माबाद: सिरसखोड फाटा

सिरसखोड मार्गाची दुरवस्था; विद्यार्थी व शेतकरी हैराण
                                                                    धर्माबाद: सिरसखोड फाटा 


(धर्माबाद तालुका प्रतिनिधी सज्जन संतोष)


सिरसखोड गावादरम्यानच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. ठिकठिकाणी पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे हा मार्ग धोकादायक बनला आहे. पावसामुळे खड्यांमध्ये पाणी असल्याने साचत वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसून, दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

सदर मार्गावरून सिरसखोड, आल्लूर, नेरळी, ईळेगाव, बामणी, मनूर संगम, माचनूर आणि हुनगुंदा येथील नागरिक, विद्यार्थी, कर्मचारी, व्यापारी व शेतकरी मोठ्या प्रमाणावर ये-जा करतात. मात्र, रस्ता उखडून खडी बाहेर आल्याने वाहनांचे नुकसान होत असून, अपघाताचा धोका वाढला आहे. खराब रस्त्यामुळे प्रवासाचा वेळही वाढत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

पावसाळ्याचे दिवस लक्षात घेऊन सिरसखोड मार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे

यंत्रणा कधी जागी होणार? रस्ता दुरुस्त कधी होणार? दरवर्षी पावसाळ्यात या मार्गावर केवळ तात्पुरती डागडुजी केली जाते. काही दिवसांत पुन्हा खड्डे पडत असल्याने यंदा मलमपट्टी न करता दर्जेदार डांबरीकरण करून

कायमस्वरूपी रस्ता तयार करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
Previous Post Next Post