विद्या विहारची जान्हवी पांडे चंद्रपूर जिल्ह्यात प्रथम...... (महेश निमसटक तालुका प्रतिनिधि भद्रावती )भद्रावती दि.चंदपूर:- माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच दहावीचा निकाल सोमवारी दिनांक 27 ला ऑनलाइन घोषित करण्यात आला, यात विद्याविहार कॉन्व्हेंट हायस्कूल आणि जूनियर कॉलेज तुकुम,चंद्रपूर येथे दहाव्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी कु.जान्हवी सुरज पांडे हिने 97.40 % गुण मिळवत जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान मिळवला.दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्या विहार कॉन्व्हेंट हायस्कूल ने आपली 100% निकालाची परंपरा कायम ठेवली असून शाळेतील जवळपास 15 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा जास्त गुण घेत मेरिट यादी मध्ये येण्याचा मान मिळवला. या अगोदरही याच शाळेची कु. वेदांती भोंगाळे ही विद्यार्थिनी सुद्धा जिल्ह्यात प्रथम आली होती हे विशेष. जान्हवीला आयआयटी अभियंता व्हायचे असून त्यासाठी सर्वतोपरी परिश्रम घेणार असल्याचे तिने सांगितले.तिने आपल्या या यशाचे श्रेय आपले आई-वडील, शाळेच्या मुख्याध्यापिका साै.शोभा रेड्डी मॅडम, सर्व शिक्षक, मार्गदर्शक यांना दिले. जान्हवी च्या या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Previous Post Next Post