जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी घेतला अनोखा उपक्रम. शिवाजी शिंदेजिल्हा प्रतिनिधी परभणी. गुरुजी घेतात विद्यार्थी यांच्या गृहभेटी.मानवत : पी.एम श्री जि. प. केंद्रीय प्राथमिक शाळा मानवत येथील उपक्रमशील आदर्श शिक्षक रामराव सोळंके यांनी 1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी निकालपत्रासोबत वर्ग दुसरीत प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांना स्वतः तयार केलेला उन्हाळी अभ्यास दिला. तो अभ्यास विद्यार्थी पुर्ण करतायत का नाही ? हे पाहण्यासाठी हे शिक्षक 100 टक्के विद्यार्थ्यांना फोन करून संपर्क करतात. एवढेच नव्हे तर ते 100 टक्के विद्यार्थ्यांच्या गृहभेटी घेतात. पालक व विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. विद्यार्थ्यी सुट्टीत अभ्यासापासून दूर जावू नयेत. याची काळजी घेतात. सदरील शिक्षक हे मेंदू विकासावर सुद्धा काम करतात. या उपक्रम शील शिक्षकाचे शाळेचे मुख्याध्यापक बनसोडे सर आणि मानवतचे नुतन गट शिक्षणाधिकारी चव्हाण साहेब यांनी कौतुक केले.
byमीडीया पोलीस टाईम
-
0