बिरसा फायटर्सच्या पाठपुराव्यामुळे केलापाणी येथे जिल्हाधिकारी यांची भेट.. उदेसिंग पराडके ग्रामीण प्रतिनिधी अक्राणीअक्राणी: स्वातंत्र्याच्या ७७ वर्षांनंतर नंदुरबार जिल्ह्यातील धडगांव तालुक्यातील केलापाणी येथील आदिवासी बांधवांना अजूनही गाढवावरून माल माल वाहतूक करावे लागते व गर्भवती महिलांना प्रसुतीसाठी झोळीतून दवाखान्यात न्यावे लागते १५ दिवसांपूर्वी झोळीतून दवाखान्यात नेतांना एका नवजात अर्भकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.या गावात दवाखाना नाही, रस्ता नाही, अंगणवाडी व विज नाही अजुनही मूलभूत सुविधा या गावात पोहोचल्या नाहीत एकीकडे शासन आदिवासींच्या विकासासाठी करोडो निधी खर्च करीत आहे परंतु प्रत्यक्षात मात्र हा निधी जोतो कुठे हा लोकप्रतिनिधी व अधिकारी मिळुन निधी गायब करतात की काय? असा सवाल सुशिलकुमार पावरा यांनी उपस्थित केला व निवेदन देण्यात आले या निवेदनाचे दखल घेऊन मा जिल्हाधिकारी मित्ताली सेठी यांनी केलापाणी या गावाला भेट देऊन तेथील लोकांच्या समस्या जाणून घेतल्या व बिरसा फायटर्स संघटनेच्या आभार .

बिरसा फायटर्सच्या पाठपुराव्यामुळे केलापाणी येथे जिल्हाधिकारी यांची भेट..                                                      
Previous Post Next Post