भ्रष्ट अधिकाऱ्यांवर दुसरी विकेट पडली; आदिवासी संघटनांचा विजयी जल्लोष!अखेर नंदुरबार जिल्हाशल्य चिकित्सक डॉ वर्षां लहाडे यांची धरणगाव येथे उचलबांगडी. (सुरतान पावरा तालुका प्रतिनिधी अक्राणी)डॉ वर्षां लहाडे जिल्हा शल्यचिकित्सक नंदुरबार यांच्या एकाधिकार, गैरवर्तणूक व भष्टाचाराची सखोल होऊन तात्काळ जिल्हा बदली करा, या मागणीसाठी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद, बिरसा फायटस, बिरसा आर्मी,विश्र्व आदिवासी सेवा संघटना आदि आदिवासी संघटनांनी जिल्ह्याधिकारी कार्यलय नंदुरबार समोर आज दिनांक २४ जानेवारी २०२५ पासून बेमुदत धरणे आंदोलन छेडले होते. आदिवासी संघटनांचे सलग ३३ दिवस धरणे आंदोलन सुरू होते आंदोलन दरम्यान चौकशी समिती आली होती. अखेर त्यांची प्रशासनाने दखल घेत वादग्रस्त जिल्हाशल्यचिकित्सक डॉ वर्षां लहाडे यांची प्राप्त तक्रारीत तथ्य आढळून आल्या कारणास्तव जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक पदावर बदली केली आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाने अवर सचिव व पां गायकवाड यांनी हा बदली आदेश काढला आहे. डॉ वर्षां लहाडे यांची नंदुरबार जिल्ह्याबाहेर बदली झाल्यामुळे भ्रष्ट अधिकारांची दुसरी विकेट पडली म्हणत आदिवासी संघटनांनी विजयी जल्लोष केला आहे. यापूर्वी शहादाचे प्रांत अधिकारी सुभाष दळवी विरोधात अनेक तक्रारीनंतर जिल्ह्याबाहेर बदली झाली होती. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ वर्षां लहाडे यांच्या आस्थापना अंतर्गत कायमस्वरूपी व कंत्राटी अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून वेतन करणे, नूतनीकरण करणे पोस्टिंग, प्रतिनियुक्ती रद्द करणे, पदोन्नती करणे,रजा मंजूर करणे, वरिष्ठ स्तरावर प्रस्ताव पाठवणे, गोपनीय अहवाल, जी.पी.एफ.काढणे इत्यादी सारख्या अनेक प्रशासकीय तसेच इतर कामांसाठी आर्थिक मागणी करणे.एन आर एच एम व नवीन पदभरती आणि तदर्थ पदभरती करण्यासाठी निवड समितीला डावलून एकतर्फी आर्थिक देवाण घेवाण करुन भरती प्रक्रिया राबवणे. वार्षिक पेटी सप्लाय स्टेशनरी कोणतीही मागणी नसताना देखील निष्कूष्ट दर्जाची स्टेशनरी खरेदी करून ग्रामीण रुग्णालयात व उपजिल्हा रुग्णालयात येथे पुरवठा करणे. डॉ वर्षां लहाडे यांच्यावर स्त्री भ्रूण हत्यासारखा गंभीर गुन्हा दाखल असून त्यांच्यावर आय पी सी कलम ४६८,४७१,४२०,१७७,१७८,१८६ अंतर्गत गुन्हा दाखल असून त्यांना नंदुरबार सारख्या आदिवासी बहुल जिल्हात जिल्हा शल्यचिकित्सक पदावर नियुक्ती का देण्यात आली?असे अनेक आरोप डॉ वर्षां लहाडेंवर करण्यात आले आहे.या भ्रष्ट अधिकाऱ्यांचे काय? खाली खोके वर पाय? डॉ वर्षां लहाडे यांची जिल्ह्यातून हकालपट्टी झालीच पाहिजे, वर्षां लाहडे चले जाव, भ्रष्ट अधिकारी चले जाव, भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे, सरकार हमचे डरती है,पुलीस को आगे करती है! अशा जोरदार घोषणा आदिवासी संघटनांनी दिल्या होत्या.

भ्रष्ट अधिकाऱ्यांवर दुसरी विकेट पडली; आदिवासी संघटनांचा विजयी जल्लोष!अखेर नंदुरबार जिल्हाशल्य चिकित्सक डॉ वर्षां लहाडे यांची धरणगाव येथे उचलबांगडी.                                                                   
Previous Post Next Post