श्री केशवराव बाबासाहेब महाराज यात्रा महोत्सवाला सुरूवात. (शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.)▶ विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन. ५ डिसेंबर रोजी सांगता.सेलू: शहराचे ग्रामदैवत तथा शिर्डीचे संत साईबाबा यांचे सदगुरु श्री. केशवराज बाबासाहेब महाराज यांच्या यात्रा महोत्सवास गुरुवार २७ नोव्हेंबर रोजी प्रारंभ होत असून शुक्रवार ५ डिसेंबर रोजी महोत्सवाची सांगता होणार आहे. यानिमित्ताने श्री. केशवराज बाबासाहेब महाराज मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.महोत्सवात नंदकुमार गोंदीकर महाराजांच्या रसाळ वाणीतून श्रीमद भागवत कथेस गुरुवार २७ नोव्हेंबर रोजी प्रारंभ होत आहे. या कार्यक्रमा दरम्यान सकाळी ९ ते १० संहिता वाचन, दुपारी १२ ते ५ कथेचे निरूपण. ह.भ.प.शाळीग्राम मापूर) यांचे २७ व २८ नोव्हेंबर रोजी रात्री नऊवाजता कीर्तन होणार आहे. २९ व३० नोव्हेंबर रोजी कीर्तनचंद्रिका दीपाली कुलकर्णी यांचे रात्री ९ वाजता कीर्तन होणार आहे. सोमवार १ डिसेंबर रोजी श्री. गीता जयंती, श्री. केशवराज बाबासाहेब महाराज (व्यंकुशाह) यांच्या पुण्यतिथी निमित्त सकाळी ७ ते ९ या वेळेत श्री. केशवराज बाबासाहेब महाराजांच्या ओवीबद्ध चरित्राचे सामुदायिक पठण (तीन पाठ) होणार आहेत. तसेच सकाळी ९ वाजता श्रीमद भागवत गीतेचे संपूर्ण अठरा अध्याय पठण, सायंकाळी 'श्रीं' ची आराधना अभिषेक व महापूजा होणार आहे. ह.भ.प. बालासाहेब नेव यांचे 'श्रीं' त्त्या चरित्रावर रात्री ९ वाजता सुश्राव्य कीर्तन होणार आहे.मंगळवार २ डिसेंबर रोजी दीपाली कुलकर्णी यांचे रात्री ९ वाजता कीर्तन होणार आहे. तसेच बुधवार ३ डिसेंबर ९ वाजता रोजी रात्री ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज वालुरकर (फडकरी) यांचे हरिकीर्तन होणार आहे. महोत्सवात लघुरुद्र अभिषेक करू इच्छिणाऱ्यांनी सुधीर मंडलिक यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन संयोजकातर्फ करण्यात आले आहे.गुरुवार ४ डिसेंबर रोजी श्री. केशवराज बाबासाहेब महाराज (व्यंकुशाह) यांच्या यात्रेचा मुख्य दिवस आहे. त्यानिमित्त दुपारी १२ वाजता 'श्रीं' ची महाआरती, दुपारी ३ वाजता पालखी मिरवणूक निघणार आहे.शुक्रवार ५ डिसेंबर रोजी ह.भ.प. सुनील महाराज आष्टीकर यांचे काल्याचे कीर्तन दुपारी ४ वाजता होणार आहे.महोत्सवातील धार्मिक कार्यक्रमासाठी शहरासह परिसरातील भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केशव मंडलिक, वामन मंडलिक, पुरुषोत्तम मंडलिक यांनी केले आहे.
byमीडीया पोलीस टाईम
-
0