फैजपूर येथे नगरपरिषद निवडणूक चे अनुषंगाने सरप्राईज नाकाबंदी व विविध भागातून रुटमार्च. (फैजपूर विरोदा प्रतिनिधी सतीष बऱ्हाटे) आज दिनांक 29/11/2025 रोजी फैजपूर नगरपरिषद निवडणूक 2025 चे अनुषंगाने सायंकाळी 5.30 ते 6.30 वाजे दरम्यान मा.उप विभागीय पोलीस अधिकारी श्री अनिल बडगूजर, यांचे मार्गदर्शनाखाली फैजपुर शहरात कृषी उत्पन्न बाजार समीती, सुभाष चौक्, डि.एन.कॉलेज याठिकाणी सरप्राईज नाकाबंदी करून संशयीत वाहनांची तपासणी करण्यात आली.तसेच खुशालभाऊ रोड, सुभाष चौक, छत्री चौक्, कुरेशी मोहल्ला, लक्कडपेठ, इस्लामपुरा, तडवीवाडा अशा भागातून रुटमार्च घेण्यात आला. त्यासाठी मा.उप विभागीय पोलीस अधिकारी श्री अनिल बडगूजर, फैजपूर पोलीस चे सहा.पो.निरी रामेश्वर मोताळे, पोउपनिरी मैनुद्दीन सैय्यद, पोउपनिरी निरज बोकील, पोउपनिरी विनोद गाभणे पोलीस आमलदार होमगार्ड एस आर पी एफ चे एक सेक्शन हजर होते.
byमीडीया पोलीस टाईम
-
0