यावल शहरासह तालुक्यात अवैध धंदे बोकाळले .भाड मे जाए जनता और अपना काम बनता अशी यावल पोलिसांची स्थिती?याकडे लक्ष देणारा कोणी वरिष्ठ अधिकारी आहे का? (भिमराव गजरे यावल विशेष जिल्हा क्राईम रिपोर्टर ) यावल तालुक्यासह यावल शहरात अवैध धंदे अनेक महिन्यांपासून बोकाळले आहेत याकडे मात्र यावल पोलिस प्रशासनाचा जाणीव पूर्वक कानाडोळा असल्याचे तालुक्याच्या जनतेकडुन बोलले जात आहे..पोलीस म्हणजे काय? सर्वसामान्य जनतेला जाणुन बुजुन त्रास देण्याचे चित्र सध्या स्थितीत उजेडात येत आहे या अशा पोलिसांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वचक नसल्याने हे यावल पोलिस सध्या स्थितीत जनतेचे रक्षक नसुन पैशांचे भक्षक झाल्याचे समजते भाड मे जाए जनता और अपना काम बनता अशी यावल पोलीसांची स्थिती झाल्याची चर्चा देखील जळगाव जिल्ह्यात वाऱ्या सारखी पसरली आहे तसेच ह्या अवैध धंदे वाल्यांना भलीमोठी मदत देखील यावल पोलिसांकडुन होत असल्याचे यावल तालुक्याच्या जनतेकडुन ऐकण्यास मिळत आहे अशा ह्या यावल पोलिसांच्या सहकार्याने अवैध धंदे वाल्यांची चांदी झाली आहे यावल शहरांमध्ये विविध प्रकारचे अवैध धंदे मोठ्या प्रमाणे सुरू आहे त्यामध्ये पत्ता सट्टा हातभट्टी दारू गांजा व इतर प्रकारचे अवैध्य धंदे सुरू आहे हे अवैध धंदे करणारे राजकीय पुढाऱ्याचा साथ घेऊन व काही स्थानिक पोलिसांच्या मदतीने हे अवैद्य धंदे सहजपणे चालू आहे यावल शहरामध्ये हातभट्टी दारूचा साठा मोठ्या प्रमाणे ग्रामीण भागातून येत असतो त्यामध्ये शेळगाव भालशीव पिपरी अशाप्रकारे यावल शहरात बऱ्याच ठिकाणी हातभट्टी दारूची वाटप होत असते व तसेच गांजा मध्यप्रदेश मार्गे हा यावल मध्ये येतो त्याचप्रमाणे यावल शहरात बऱ्याच ठिकाणी ढाब्यावरती जेवणाच्या आडून अवैध दारू विकली जाते तसेच यावल शहरांमधल्या विस्तारित भागात अवैध्यरीत्या पत्त्याचा क्लब टाकून लाखो रुपयाची हेराफेरी होत असते त्याचप्रमाणे यावल शहरात सट्टा मोठ्या प्रमाणात छोट्या छोट्या दुकानावरती उघडपणे लिहिला जातो अशाच प्रकारचे अवैध धंदे चालू असताना शहरातला तरुण वर्ग हा लोभाने कर्जबाजारी होत चालला आहे हे सर्व बघून सुद्धा यावल स्थानिक पोलीस प्रशासन यांच्याकडे लक्ष का देत नाही असा प्रश्न यावलच्या नागरिकाकडून होत आहे

यावल शहरासह तालुक्यात अवैध धंदे बोकाळले .भाड मे जाए जनता और अपना काम बनता अशी यावल पोलिसांची स्थिती?याकडे लक्ष देणारा कोणी वरिष्ठ अधिकारी आहे का?                                                    
Previous Post Next Post