सुभाष व्यायाम प्रसारक मंडळ, हिंगणघाट यांच्या वतीने आयोजित सत्कार व लोकप्रतिनिधींशी सुसंवाद कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. .!📅 दिनांक : ०४ जानेवारी २०२६📍 स्थळ : सुभाष मंडळ संचालित व्यायाम शाळा, हिंगणघाटया कार्यक्रमास कार्यसम्राट आमदार मा. श्री. समीरभाऊ कुणावार प्रमुख उपस्थित होते.त्यांनी पूर्वी दिलेल्या शब्दाप्रमाणे व्यायाम शाळेसाठी आवश्यक व्यायाम साहित्य प्रदान करण्यात आले. मैदानी खेळ, व्यायाम संस्कृती व युवकांच्या शारीरिक विकासाला सातत्याने पाठबळ देणाऱ्या माननीय समीरभाऊ कुणावार यांच्या प्रयत्नांमुळे हे जुने व प्रतिष्ठित मंडळ आजही सक्षमपणे कार्यरत असून, या मंडळातून अनेक गुणवंत व नामवंत खेळाडू घडले आहेत. यावेळी मंडळातील ज्येष्ठ खेळाडूंचा गौरवपूर्वक सत्कार करण्यात आला.हिंगणघाट शहराच्या नगराध्यक्ष म्हणून क्रीडा, व्यायाम व आरोग्यसंपन्न समाजनिर्मितीला प्राधान्य देत सशक्त क्रीडा संस्कृती जोपासण्याचा निर्धार यानिमित्ताने व्यक्त करण्यात आला.या प्रसंगी नवनिर्वाचित नगराध्यक्षा डॉ नयना उमेश तुडसकर, व प्रभाग क्र. ११ च्या नगरसेविका सौ. दुर्गाताई काशीरामजी चौधरी, नगरसेवक श्री. धनंजय केशरराव बकाणे, तसेच प्रभाग क्र. १० चे नगरसेवक श्री. नरेश पांडुरंग युवनाथे व नगरसेविका सौ. सोनुताई देवेश कुबडे यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाला मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व क्रीडाप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा
byमीडीया पोलीस टाईम
-
0