देगलूरमध्ये युवासेनेची जनसेवा; साठे चौकात मोफत थंड पाणपोई सुरू.. (पिंजारी माहेमूद तालुका प्रतिनिधी देगलूर ) देगलूर :उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा देण्यासाठी युवासेनेच्या वतीने देगलूर शहरातील साठे चौक येथे मोफत थंड पाणपोई सुरू करण्यात आली. या पाणपोईचे उद्घाटन शिंदे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख व्यंकटराव पाटील खतगावकर यांच्या हस्ते शुक्रवार (दि. १३) रोजी दुपारी करण्यात आले.युवासेना अध्यक्ष नामदेव पाटील देगावकर यांच्या पुढाकारातून साठे चौकातील साईराज टी स्टॉल शेजारी ही पाणपोई सुरू करण्यात आली आहे. उन्हाळ्याच्या तीव्र झळा जाणवत असताना शहरातील नागरिक, प्रवासी तसेच वाहनधारकांना या पाणपोईमुळे मोठा दिलासा मिळणार आहे.उद्घाटनप्रसंगी अण्णासाहेब पाटील आर्थिक म हामंडळ, मुंबईचे संचालक तसेच खारदेव नगर व्यापारी मंडळाचे अध्यक्ष अशोक पाटील राजूरकर, ड. अंकुशराजे जाधव, डॉ. मिलिंद शिकारे, डॉ. धुमाळे, डॉ. एकनाथ केरुरकर, ड. कापसे, सुनील मदनुरे, मनोहर देगावकर, सुरेश चिलवेरी, सुनील थडके, सुनील पाटील, बंटी जाधव पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमास शिवसैनिक, युवासेना पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उन्हाच्यातडाख्यात नागरिकांना थंड पाण्याचा दिलासा देणारा हा उपक्रम कौतुकास्पद असून सामाजसेवेच्या कार्यात युवासेना नेहमीच पुढाकार घेत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
byमीडीया पोलीस टाईम
-
0

