श्री गुरुदेव आश्रम, पळसखेड (सपकाळ) येथे व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन*
*
मानवत परभणी जिल्हा विभागीय संपादक/ अनिल चव्हाण.
सर्व भाविक भक्तांना कळविण्यात येते की, श्री गुरुदेव आश्रम पळसखेड सपकाळ येथे प.पू. परमहंस परिव्राजकाचार्य श्री श्री १००८ स्वामी हरिचैतन्यानंद सरस्वतीजी महाराज यांच्या प्रेरणेतून शुक्रवार दिनांक १५/०५/२०२६ ते रविवार ३१/०५/२०२६ पर्यंत व्यक्तिमत्व विकास शिबीर आयोजित केले आहे. या शिबीरात योगासन, प्राणायाम, श्रीमद् भगवद् गिता, गायन, हार्मोनियम, टाळ, मृदंग, पावल्या, हरिपाठ, खेळ, प्रबोधन, (विविध विषयांवरती), स्पर्धा परिक्षेचे मार्गदर्शन, संत साहित्याची माहिती इत्यादी विषय शिकविल्या जाईल. त्यासाठी प्रशिक्षित शिक्षकांची नियुक्ती आश्रमातर्फे करण्यात आलेली आहे.
शिबीरात प्रवेशासाठी खालील नियम व अटी
१) प्रशिक्षणार्थीची वयोमर्यादा (११ ते १६) वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल.
२) शिबिराच्या पहिल्या दिवशी प्रवेश निश्चित करावा.
३) पोषाख पांढरा नेहरु शर्ट, पयजामा, टोपी. ४) प्रशिक्षणार्थ्यांनी मृदंग, हार्मोनियम शिकण्यासाठी स्वतःचे साहित्य आणावे.
५) प्रवेश फी ५०० रु. राहील. सोबत आणावयाचे साहित्य श्रीमद्भगवद् गिता, हरिपाठ, आंथरुण-पांघरुण इ. सोबत आणावे तसेच
रजिस्टर, पेन आणावा व १ पासपोर्ट साईज फोटो.
६) पालकांनी विद्यार्थ्यांना वारंवार भेटण्यासाठी येऊ नये. ७) ज्या विद्यार्थ्यांना आश्रमात इयत्ता ८ वी मध्ये प्रवेश घ्यायचा आहे. त्यांनी या शिबीरामध्ये प्रवेश घेणे गरजेचे आहे. ८) मोबाईल सोबत आणू नये. ९) शिस्तीचे पालन करावे लागेल.
टिपः शिबीरामध्ये प्रवेश घेतल्यानंतर शिबीर पुर्ण होई पर्यंत थांबावे लागेल. विद्यार्थी मध्यंतरी शिबिर सोडून गेल्यास प्रवेश शुल्क परत मिळणार नाही.
शिबिरात विद्यार्थ्यांना भोजन व राहण्याची व्यवस्था आश्रमामध्ये केलेली आहे. प्रवेश संख्या मार्यादित आहे. शिबीरामध्ये प्रवेश नोंदणी दिनांक १४/५/२०२६ पर्यंत श्री गुरुदेव आश्रम पळसखेड सपकाळ येथे करावी.
संपर्क : श्री हरिदास महाराज ७७०९६१७२१८ श्री नागेश पालवे ९३७००७८७१५ * श्री गणेश महाराज ९९२२६२९१२२
विनीत : समस्त भक्त मंडळी, श्री गुरुदेव आश्रम पळसखेड सपकाळ यांनी केले आहे.
***

