*
नगराध्यक्ष असेफ खाॅन यांच्या मार्गदर्शनाखाले दिव्यांग बांधवांना उपनगराध्यक्ष अलोक चौधरी यांच्या हस्ते ५% निधीचे वाटप*
*
मानवत परभणी जिल्हा संपादक/ अनिल चव्हाण
९५२७३०३५५९-
——————————
दिव्यांग बांधवांना नगरपरिषद पाथरीतर्फे ५ टक्के निधीचे धनादेश वाटप
नगरपरिषद पाथरीतर्फे दिव्यांग बांधवांना ५ टक्के निधीअंतर्गत आर्थिक सहाय्याचे धनादेश वाटप करण्यात आले. नगराध्यक्ष आसेफ भैया खान यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात लाभार्थ्यांना निधीचे धनादेश प्रदान करण्यात आले.
यावेळी उपनगराध्यक्ष अलोक चौधरी ,नगरसेवक गोविंदराव हरकळ, नगरसेवक उद्धवराव नाईक, नगरसेवक खालेद बिन हवेल, नगरसेवक अनिलराव ढवळे तसेच नगरसेवक अमोल भाले पाटील यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान मनोगतात बोलताना सांगितले की, , दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी नगर परिषद पातळीवर विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून, शासनाच्या योजना व सुविधा तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येतील. दिव्यांग बांधवांच्या सक्षमीकरणासाठी नगर परिषद सदैव कटिबद्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सदर कार्यक्रमाला नगरपरिषद दिव्यांग विभाग प्रमुख फसी कादरी यांच्यासह नगरपालिका कर्मचारी व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
***

