बकरी ईद निमित्त यावल येथे पोलीस स्टेशन मध्ये शांतता समितीची मीटिंग पार पडली.
यावल शहर प्रतिनिधी.आरिफ खान
दिनांक 26/5/2026 मंगळवार रोजी शांतता समितीची मीटिंग सकाळी दहा वाजता पोलीस प्रशासन तर्फे आयोजीत करण्यात आली होती या मिटींगला जळगाव जिल्हा अप्पर पोलिस अधीक्षक संदीप जी गावित साहेब यांनी यावल शहर हे शांतता प्रिय शहर आहे यावल येथे सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात आणि एकमेकांशी व्यवहार असल्यामुळे आणि चांगल्या संबंधामुळे येथे कदाचित अप्रिय घटना घडणार नाही. कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्न निर्माण होणार नाही अशी आपण सर्व नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे सदर मिटींगला जळगाव जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक संदीप जी गावित साहेब. डी वाय एस पी. अनिल बडगुजर साहेब यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे साहेब प्रतिष्ठित नागरिक ज्येष्ठ नागरिक व नगरसेवक. समाजसेवक. व शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा संघटक नितीन भाऊ सोनार व पत्रकार बांधव उपस्थित होते

