मातृ तीर्थकुंडात राणडुकराचा तडफडून मृत्यू
पाण्याअभावी तडफडून जंगली जनावरांचे दररोज होत आहेत मृत्यू
श्रीक्षेत्र माहूर तालुका प्रतिनिधी शेख रफिक गाईड माहूर गड
माहूर तालुक्यातील घनदाट जंगलात जनावरासाठी पिण्या चे पाणी नसल्याने जंगली जनावरे पाणी पिण्यासाठी तलाव कुंडात जात असताना पाणी पिल्यानंतरही मृत्यू होत असून प्रसिद्ध पवित्र मानल्या गेलेल्या मातृ तीर्थ कुंडात तहान जास्त लागल्याने पाणी जास्त पीले गेल्यामुळे रानडुकराचा कुंडातील पाण्याजवळच तडफडून मृत्यू झाल्याची घटना दि 26 दुपारी 12 वाजता घडली आहे
माहूरच्या जंगलात पिण्यासाठी कुठेही पाणी नसल्याने मोठे तलाव कुंडामध्ये पाणी उपलब्ध असल्याने अनेक किलोमीटरचा प्रवास करून हे पाणी पिण्यासाठी जंगली जनावरे येत असताना अनेक जनावरांचा रस्त्यातच मृत्यू होत आहे तर गडावरील रस्त्यावर असलेल्या पाण्याचा वॉल जवळही अनेक जनावरे डुकरे पाणी पिन्या आधीच तडफडून मृत्युमुखी पडत असून माहूरचे वैभव असलेल्या जंगलात सर्व प्रकारचे प्राणी पिण्याचे पाणी नसल्याने धोक्यात आले असून जैवविविधतेवर याचा परिणाम होऊन जंगलातून जंगली जनावरे नामशेष होण्याची वेळ आली आहे
जंगलात जनावरासाठी पाणी उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली कोट्यावधी रुपयाचा निधी गिळंकृत करून पाण्यासाठी जंगली जनावरांचा मृत्यू होताना उघड्या डोळ्यांनी पाहणारे वनपरिक्षेत्र अधिकारी यांना एक वर्ष मुदत वाढ देऊन शासनाने जंगलातील जनावरे नामशेष करण्याचा मार्ग मोकळा केला असून वृक्षतोड मुळे आधीच जंगल विरळ होत असताना जगली जनावरे नामशेष झाल्यानंतर बोडके झालेले जंगल पुढील उन्हाळ्यात माहूरकरावर काय परिणाम करेल याचा अंदाज लावणे कठीण असून आता तरी काही ठिकाणी निसर्गनिर्मित खड्ड्यात पाणी टाकून जंगली जनावरांची तहान भागवावी अशी मागणी होत आहे

