शहरातील गौतम नगर परिसरातील वाघाच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीती*

*शहरातील गौतम नगर परिसरातील वाघाच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीती* 

 महेश निमसटकर 
 चंद्रपूर जिल्हा विभागीय संपादक 


भद्रावती, दि. २४ :भद्रावती शहरातील  आयुध निर्माणि लगतच्या गौतम नगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाघाचा  वावर दिसून येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नगरसेवक महेश मारोती जीवतोडे यांनी वनविभागाकडे निवेदन सादर करून वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

निवेदनानुसार, गौतम नगर परिसर तसेच शिखा बाघमारे यांच्या घराजवळील मोकळ्या जागेत वाघ वारंवार फिरताना दिसत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले.
दि. ०१ जून २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास वाघाने परिसरातील एका कुत्र्यावर हल्ला करून त्याचा फडशा पाडल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीती अधिक वाढली असून सायंकाळनंतर घराबाहेर पडण्यास नागरिक टाळाटाळ करीत आहेत.

 वनविभागाने तात्काळ उपाययोजना करून वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

निवेदन सादर करताना नियोजन सभापती राहुल सोनटक्के तसेच नगरसेवक संतोष कुरेकार आदी उपस्थित होते.
Previous Post Next Post