उपजिल्हा रुग्णालय देगलूर येथे आज एकुण १५ रुग्णांवरती शस्त्रक्रिया संपन्न..

उपजिल्हा रुग्णालय देगलूर येथे आज एकुण १५ रुग्णांवरती शस्त्रक्रिया संपन्न..

पिंजारी माहेमूद 
तालुका प्रतिनिधी देगलूर 

देगलूर : दिनांक २३ जून २०२६ रोजी जिल्हा शल्यचकित्सक डॉक्टर पेरके यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय वैद्यकीय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नरेश देवणीकर यांच्या देखरेखीखाली उपजिल्हा रुग्णालय देगलूर येथे १५ रुग्णांवरती यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या... ०२ रुग्णांवरती प्रसूतीच्या सिझेरीयन शस्त्रक्रिया करण्यात आल्या, सदरच्या शस्त्रक्रिया देगलूर चे नामांकित स्त्री रोग तज्ज्ञ डॉ कपिल ऐकलारे यांनी केल्या....तसेच ०८ रुग्णांवरती स्त्री कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. सदर शस्त्रक्रियेसाठी उपजिल्हा रुग्णालय बिलोली येथील स्त्री रोग तज्ञ डॉक्टर मोरे यांनी सदरच्या शस्त्रक्रिया पार पाडल्या ... तसेच ०१ रुग्णांवरती अपेंडिक्स ०१ हायड्रोसिल, ०१ इंग्विनल हर्णिया आणि ०२रुग्णांवरती गाठींचे शस्त्रक्रिया करण्यात आल्या... सदरच्या शस्त्रक्रिया जिल्हा रुग्णालय नांदेड येथील सर्जन डॉ गोपाल शिंदे यांनी पार पाडले.... सदरच्या शिबिरासाठी भूलतज्ञ म्हणून डॉ अनिल थडके, डॉक्टर महेश पेटकर, तसेच इन्चार्ज दीक्षित सिस्टर, ओटी इन्चार्ज मोमिन सिस्टर, येरेवाड ब्रदर, स्वामी सिस्टर, जमील, गौतम, विजय चेंडके, अहमद तसेच उपजिल्हा रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली... अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन उपजिल्हा रुग्णालय देगलूर येथे दर महिन्याच्या प्रत्येक मंगळवारी करण्यात येणार आहे आणि डोळ्याचे शस्त्रक्रिया दर महिन्याच्या प्रत्येक शनिवारी करण्यात येणार आहे... तरीही वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नरेश देवनीकर यांनी सदर शिबिराचा लाभ घेण्यासाठी गरजूंनी उपजिल्हा रुग्णालय देगलूर येथे शस्त्रक्रियेसाठी येताना महात्मा फुले जन आरोग्य योजने साठी आवश्यक कागदपत्रे जसे आधार कार्ड, रेशन कार्ड, आयुष्यमान कार्ड, सोबत घेऊन यावे व सदर शिबिरांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले....
Previous Post Next Post