डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी शेषणाग गजभिये यांचे 'जिवंत समाधी' आंदोलन.
(विदर्भ मराठवाडा संपादक- अब्दुल कदिर जेष्ठ पत्रकार वर्धा जिल्हा)
👇
अमरावती-
शहरातील ऐतिहासिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते शेशनाग गजभिये यांनी रविवारी 'जिवंत समाधी' आंदोलन सुरू करून प्रशासनात मोठी खळबळ उडवून दिली.
आंदोलनाची पार्श्वभूमी आणि मागणी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी गजभिये यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. त्यांच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी निश्चित केलेली जागा तात्काळ हस्तांतरित करावी.
अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) चे नामकरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामान्य रुग्णालय असे करावे.
ऐतिहासिक शिवटेकडीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा १०० फूट उंच पुतळा उभारण्यात यावा.
जिल्हा सत्र न्यायालय परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ५० फूट उंच पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा. प्रशासनाची धावपळ आणि पाठिंबा
आंदोलनाची माहिती मिळताच गाडगेनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी गोरखनाथ जाधव हे पोलीस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलकांशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. दरम्यान, माजी लेडी गव्हर्नर कमलताई गवई यांनी आंदोलनास्थळी भेट देऊन या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवला.
तसेच, प्रशासनाच्या वतीने तहसीलदार टीया चव्हा यांनी घटनास्थळी येऊन आंदोलकांना लेखी आश्वासन दिले. या आश्वासनानंतर शेshनाथ गजभिये यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी दाखल करण्यात आले. मात्र, मागण्या मान्य न झाल्यास १५ ऑगस्ट रोजी पुन्हा जिवंत समाधी घेण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

