कराटे बेल्ट व प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न
खेळाडूंनी आयएएस,आयपीएस अधिकारी बनून देशसेवेचे कार्य केल्यास अधिक प्रभावी ठरेल!
.....पंडीत शंकरप्रसादजी अग्निहोत्री
(राजू कांबळे
मिडिया पोलीस टाईम
वर्धा, नागपूर, अमरावती विभागीय संपादक )
वर्धा : ( दि 5 जुलै ) पेंटागॉन हॉल, अग्निहोत्री कॉलेज, रामनगर वर्धा येथे स्पोर्ट शोतोकान कराटे - डो असोसिएशन ऑफ इंडिया द्वार संलग्नित स्पोर्ट कराटे असोसिएशन वर्धा जिल्हा द्वारा आयोजित कराटे बेल्ट व प्रमाणपत्र वितरण सोहळा पार पडला .
या सोहळ्या प्रसंगी पंडित शंकररावजी अग्निहोत्री आपले विचार व्यक्त करताना बोलत होते की ,
खेळाडूंनीही आपल्या क्रीडा कारकिर्दीसोबतच देशसेवेची नवी वाट निवडावी, बौद्धिक, शारीरिक, मानसिक व आत्मिक बलासह कष्ट, शिस्त, चिकाटी आणि संघभावनेतून
मैदानापुरते मर्यादित न राहता राष्ट्र उभारणीसाठी " फक्त विजेता " न होता देश सेवक ही बनावे. समाज सुरक्षा आणि शिस्त या क्षेत्रांतही योगदान द्यावे.
खेळाडूंनी आयएएस, आयपीएस, सेवांच्या माध्यमातून पुढे येणे ही अभिमानाची बाब ठरू शकते.
खेळामुळे व्यक्तिमत्त्व घडते, आणि त्या व्यक्तिमत्त्वाचा उपयोग राष्ट्र उभारणीसाठी झाला, तर तो खरा विजेता ठरेल. हीच काळाची गरज आहे.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून एकलव्य मार्शल आर्ट अकॅडमीचे संचालक पवन तिजारे, प्रमुख अतिथी म्हणून वर्धा कला महोत्सव चे अध्यक्ष संदीप चिचाटे, महात्मा फुले प्रतिष्ठान वर्धा जिल्ह्याच्या अध्यक्ष रोहिणीताई पाटील, तर प्रमुख उपस्थितीत स्पोर्ट कराटे असोसिएशन वर्धा जिल्ह्याचे कार्याध्यक्ष संतोष सेलूकर, उपाध्यक्ष मोहन मोहिते, सहसाचिव हरीश पाटील, सभासद निखिल सातपुते, प्रवीण पेठे, सचिन झाडे,
संचालक मंडळातील विश्वसिंधी सेवा संगम चे राष्ट्रीय उपाध्यक्ष भगवानदास आऊजा, माजी असिस्टंट पोलीस कमिशनर गंगाधरजी पाटील, वुशू स्पोर्ट असोसिएशन वर्धा जिल्ह्याचे अध्यक्ष निलेश राऊत, अभिजीत रघुवंशी, प्रशांत येंडे व इत्यादी मान्यवर प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन संघटनेचे संस्थापक तथा जिल्हा सचिव शिहान मंगेश भोंगाडे यांच्या मार्गदर्शनात सावंगी (मेघे) शाखाप्रमुख सेन्साई चेतन जाधव, रामनगर शाखाप्रमुख सेन्साई पूजा गोसटकर, कृष्णा नगर शाखाप्रमुख सेन्साई ऋषभ चावरे, बोरगाव मेघे शाखाप्रमुख सेन्साई रुजान बांगमोरे यांनी केले. संचालन ऑल इंडिया युनिव्हर्सिटी कलर कोड खेळाडू नीता मोहर्ले यांनी केले तर आभार मान्यताप्राप्त वर्धा जिल्हा कराटे असोसिएशनचे कोषाध्यक्ष सौ मनीषा राऊत यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सेन्साई शुभम राखडे, कार्तिक भगत, सेन्साई तेजस निवल, सुशांत जीवतोडे, भार्गव खेवले, देवांशु लाखे, गायत्री अवसरे, प्रथमेश धाबर्डे, जान्हवी नांदुरकर व स्पोर्ट कराटे असोसिएशनच्या सर्व सभासदांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येत खेळाडू, पालक वर्ग व क्रीडाप्रेमी उपस्थित होते.

