यावल–विरावली–दहिगाव–सावखेडा मार्गावरील धोकादायक झाडांच्या फांद्या,दिशादर्शक फलकाकडे सा.बां.विभागाचे दुर्लक्ष.
(महाराष्ट्र राज्य सहसंपादक सुरेश पाटील यावल)
यावल दि.२७ ( सुरेश पाटील ) यावल–विरावली–दहिगाव–सावखेडा या सार्वजनिक वापराच्या रस्त्याच्या आजूबाजूस साईट पट्ट्यांना लागून मोठ्या प्रमाणात काटेरी झाडे झुडपांच्या फांद्यांमुळे वाहनचालक व प्रवाशांचा सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे या मार्गावर आवश्यक दिशादर्शक वेगमर्यादा धोकादायक वळण शाळा परिसर तसेच इतर वाहतूक व सुरक्षा सूचना फलक तातडीने बसविण्यात यावेत, या मागणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज फाउंडेशनचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते विरावली ग्रा.पं.माजी सदस्य ॲड.देवकांत बाजीराव पाटील यांनी यावल येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयात लेखी निवेदन दिले.
सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपिक विकास बी.जंजाळे यांच्याकडे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की,यावल ते विरावली ते
दहिगाव – सावखेडा मार्ग हा अनेक गावांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे या मार्गावर दररोज शालेय विद्यार्थी,महिला, ज्येष्ठ नागरिक,शेतकरी,कामगार यांच्या सर्व प्रकारच्या वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असताना रस्त्यालगतच्या झाडांच्या वाढलेल्या फांद्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत समोरून येणारी वाहने दिसून येत नसल्याने तसेच विशेषतः बस,ट्रक व इतर मोठ्या वाहनांच्या प्रवाशांना झाडांच्या फांद्यांमुळे दुखापत होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
सध्या पावसाळा सुरू असल्याने झाडांच्या फांद्या अधिक झुकल्याने अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. कोणतीही जीवितहानी होण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी तसेच मार्गावर दिशादर्शक फलक, वेगमर्यादा फलक,धोकादायक वळणाची सूचना,शाळा परिसराची सूचना,गाव हद्द दर्शविणारे फलक,परावर्तित सूचना फलक तसेच इतर आवश्यक रस्ता सुरक्षा चिन्हांचे
फलक लावावे अशी मागणी ॲड.देवकांत पाटील यांनी केली आहे.

