जनकल्याण मराठी पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी प्रशांत बाफना

जनकल्याण मराठी पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी प्रशांत बाफना

अहिल्यानगर (प्रशांत बाफना) : 

बालमटाकळी ता.शेवगाव येथील मूळ रहिवासी आणि सध्या अहिल्यानगर येथे वास्तव्यास असलेले शांत, संयमी व तत्त्वनिष्ठ पत्रकार प्रशांत बाफना यांची जनकल्याण मराठी पत्रकार संघाच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याचे पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संतोष जाधव यांनी कळविले आहे.
         पत्रकारिता हा लोकशाहीमधला चौथा स्तंभ म्हणून मानला जातो. समाजमनातील वास्तव जनतेपर्यंत घेऊन जाण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी पत्रकारांवर असून पक्ष, जात, धर्म, पंथ, भाषा, प्रांत अशी तकलादू बंधने झुगारून देत त्यांनी आपली कलम चालवणे अपेक्षित असते. सध्याच्या डिजिटल आणि पेडन्यूजच्या जमान्यात प्रशांत बाफना हे विश्वासू आणि मुक्त पत्रकारितेसाठी जिल्हाभरात ओळखले जातात. समाजाच्या तळागाळापर्यंत पोहचून तेथील सकारात्मक कार्य, विचार आणि आँखोदेखी ते बातमीच्या माध्यमातून सर्वदूरपर्यंत पोहोचविण्याचे काम करत असल्याने त्यांच्या या कार्याची दखल घेऊन नाशिक स्थित जनकल्याण मराठी पत्रकार संघाच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आल्याचे रफिक सय्यद, सुधीर उमराळकर, सौ.मनिषा पवार, अकिल पटेल यांनी सांगितले.
         पत्रकार बाफना यांच्यावर एकता फाउंडेशन अहिल्यानगर प्रसिद्धीप्रमुख म्हणूनही जबाबदारी असून त्यांची पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल एकता फाउंडेशन महाराष्ट्र राज्य च्या कोअर कमिटीतील पदाधिकाऱ्यांसह अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे
Previous Post Next Post