*राजकीय ओळख न दाखवता भरला तीन हजाराचा दंड* (पारोळा तालुका प्रतिनिधी)राजकीय क्षेत्र म्हटल की दबाव तंत्र वशिला दमबाजी किंवा राजकीय ओळखीच्या फायदा घेणे आम्ही या नेत्यांचे कार्यकर्ते आहोत म्हणून एखाद्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांवर रोष झाडून दबाव तंत्राचा वापर करणे हा प्रकार खूप वाढला असून तो नेहमीच बघायला मिळतो पण त्यास अपवाद ते आरोग्यदूत सर्व परिचित असणारे रुग्णांच्या हाकेला ओ देणारे आरोग्य दूत तथा जिल्हा दूध संघाचे संचालक तसेच अनेक आमदार खासदार मंत्री यांच्याशी ओळख असलेले आणि गिरीश महाजन यांचे अत्यंत विश्वासू व खंदे समर्थक अरविंद देशमुख आपले वाहन घेऊन आकाशवाणी चौकातून कार्यालयाकडे जात असताना दुपारी त्यांची गाडी वाहतूक पोलिसांनी थांबवली गाडी थांबवल्यानंतर त्यांच्याकडे रीतसर कागदपत्रांची मागणी केली त्यांच्याकडे पुरेसे कागदपत्र नसल्याने त्यांना दंडाची तरतूद म्हणून 100,500,तब्बल 3000 रुपये दंड ठोठावण्यात आला पोलिसांनी दिलेल्या दंड हा प्रामाणिकपणा दाखवून ऑनलाईन पद्धतीने भरून दिला त्या ठिकाणी वाहतूक पोलिसांचे सहकारी यांनी त्यांना ओळखल्यानंतर अरविंद देशमुख यांनी त्या पोलिसाला सांगितले की तुम्ही तुमचे काम निस्वार्थपणे निभावत आहात.
byमीडीया पोलीस टाईम
-
0

