"मुलांवर संस्कार करायला पालकांना नाही वेळ, मोबाईल ने झाला मुलांच्या आयुष्याचा खेळ"- प्राध्यापक तोहिद मुजावर! (सांगली जत प्रतिनिधी इम्रान शेख )दि.29:-धावडवाडी तालुका जत येथे प्रख्यात प्लेसमेंट ऑफिसर व सुप्रसिद्ध प्रेरक वक्ता प्राध्यापक तोहिद मुजावर यांनी शुक्रवारी धावडवाडी मदिना मस्जिद मरकज येथे पालकांशी आणि न्यू इंग्लिश स्कूल धावडवाडी येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधला. प्राध्यापक तोहीद मुजावर यांनी धावडवाडी मरकज मध्ये पालकांशी संवाद साधताना सांगितले की आजच्या एकविसाव्या शतकामध्ये पालक आणि मुलांच्या मधील संवाद कमी झाला असून पालकांचा मोबाईलशी आणि मुलांचाही मोबाईलशी संवाद वाढला असून आई-बाबांना मुलांवर संस्कार करायला वेळ नाही... मग अनुषंगाने ही मातीचा गोळा असलेली मुले instagram facebook अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या बालमनावर वाईट संस्कार करून घेतात आणि मग वेळ निघून गेल्यावर आई-वडिलांना पश्चातापाशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे आई-वडिलांनी आपल्या मुलांना जवळ घेऊन त्यांच्याशी प्रेमाने आपुलकीने बोलावे त्यांची विचारपूस करावी त्यांच्यावर चांगली संस्कार करावे.आजकलची पीढ़ी ही व्यसनाधीन होत असताना दिसत आहे.लहान लहान मुले ऑनलाइन जुगार मध्ये अडकून जंगली रम्मी, रम्मी सर्कल अश्या आप्स वर जुगार खेळताना सापडताहेत व कर्जबाजारी होऊन आत्महत्या करतआहेत. Fraud video calling karun मुलांना खोट्या फेक video's बनवून viral करण्याची भीती दाखवून लाखो रुपये ची मागणी करून मुलांचे मानसिक अत्याचार करण्यात येत आहेत.पालकांचे यावर बारीक लक्ष असणे गरजेचे आहे असे पुढे प्राध्यापक तोहिद मुजावर म्हणाले. PUBG सारखे गेम्स अगदी जीवावर बेततात व वेळ निघून गेल्यावर पालकांच्या लक्षात येते. त्याच बरोबर मुलीसुद्धा या अनेक fraud मुलांच्या जाळ्यात अडकत आहेत.Instagram व facebook च्या माध्यमातून मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून, वयात आलेल्या मुलींना लॉज वर बोलवून त्यांचे शारीरिक छळ देखील झाल्याचे अनेक घटना समोर आल्याचे मुजावर सर म्हणाले.त्यानंतर प्राध्यापक तोहिद मुजावर यांनी न्यु इंग्लिश स्कूल धावडवाडी येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हणाले की, आज आपण ज्या शाळेत शिकत आहात.या शाळेच्या इमारतीची एकेकाळी परिस्थिती वाईट होती. विद्यार्थ्यांना बसायला जागा नव्हती परंतु मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने या तुमच्या शाळेला 40 लाख रुपये खासदार निधीतून दिले त्यांनी ही इमारत उभी राहिली आज तुम्ही या शाळेत शिकत असताना मनामध्ये हा विचार घेऊन शिका कि तुमच्यातला भविष्यामध्ये एखादा मुलगा किंवा मुलगी क्रिकेटर होईल आमदार होईल खासदार होईल आय ए एस ऑफिसर किंवा एखादा मोठा माणूस होईल मग परोपकारी भावनेने किंवा एक दानत म्हणून तुम्ही सुद्धा या तुमच्या शाळेला केव्हा महाराष्ट्रातल्या दुसऱ्या एखाद्या गरजू शाळेला अशी एखादी मदत करा हे अपेक्षा मी बाळगतो असे त्यांनी आव्हान केले...

मुलांवर संस्कार करायला पालकांना नाही वेळ, मोबाईल ने झाला मुलांच्या आयुष्याचा खेळ"- प्राध्यापक तोहिद मुजावर!                                                                       
Previous Post Next Post