बऱ्याच व्यक्तींना सिसिटिव्ही कॅमेराचे महत्व कळत नाही?चिमूर पोलीस स्टेशन पुढील अभ्रक प्रकरण,पोलिसांसाठी आव्हानात्मक. (महेश निमसटकर तालुका प्रतिनिधी भद्रावती )भद्रावती दि.3:- चिमूर :-बऱ्याच व्यक्तींना सिसिटिव्ही कॅमेराचे महत्व कळत नाही.म्हणूनच ते न भिता बेकायदेशीर कृत्य किंवा कृती सिसिटिव्ही कॅमेरे लावून असलेल्या स्थळाच्या परिसरात करतात. असाच प्रकार चिमूर पोलिस स्टेशन पुढील आवारात घडला असून सिसिटिव्ही कॅमेराचे महत्व महिती नसल्याने संबंधित आरोपींनी अभ्रकाला चिमूर पोलिस स्टेशन पुढे ठेवले व ते पसार झाले. सीसीटीव्ही कॅमेरा पोलीस स्टेशन समोर लावून असतांनाच एक मृत अर्भक आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आली आहे. हि घटना परवाच्या दिवशी शनिवारला रात्री आठ वाजताच्या सुमारास चिमूर पोलीस ठाण्यासमोर उघडकीस आली. चिमूर शहरात परवाच्या दिवशी रात्री नऊ महिन्याचा मृत अर्भक आढळून आला.शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग ३५३. ई लगत चिमूर पोलीस स्टेशन लागुन आहे. परवाच्या रात्री काही लोकांना रस्त्यालगत एक अर्भकाला मोकाट कुत्रे खात असल्याचे लक्षात आले,लगेच पोलीसांना माहीती देण्यात आली. पोलीसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता अर्भक असल्याचे लक्षात आले. पोलीसांनी लगेच त्या अर्भकाला ताब्यात घेतले अर्भकाचा पाय छाती खालील भाग कुत्र्यांनी खाल्ले आहे,तोंड व पाय कायम असल्याचे पोलिसांना दिसून आले. सदर अर्भक ९ महिन्याचा असल्याची माहिती आहे.शहरातील मोकाट कुत्र्यांनी अर्भकाला खाल्ले असावे असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.सदर अर्भकाला पोलीस स्टेशन समोरच कुणी टाकले यांचा शोध पोलीसांना घ्यावा लागणार आहे. पोलीस स्टेशन समोर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ही सर्व दृश्य टिपले गेल्याचे बोलले जात आहे. मात्र काही नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस स्टेशन समोरील सीसीटीव्ही कॅमेरा अनेक महिन्यांपासून बंद असतील तर पोलीस स्टेशन समोरील परिसरात अभ्रकाला टाकणाऱ्या त्या कुमारी मातेचा शोध घेणे पोलिसांसाठी अवघड ठरू शकत. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संतोष बाकल यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हारी ताळीकोटे करीत आहेत.
byMEDIA POLICE TIME
-
0