विघातक नको विधायक मार्गाने लढा .. यश आपलेचकेंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष.. हंसराज भैया अहिर.. महेश निमसटकर तालुका प्रतिनिधि भद्रावती भद्रावती दि.1:- १९९४ मध्ये अधिग्रहित जागेवर आता कुठे नविन अत्याधुनिक उद्योग उभारण्याची लगीन घाई महाराष्ट्र शासनाने आखली आहे मात्र स्थानीक भूमी धारक व प्रकल्पग्रस्त यांचे न्याय हक्क डावलून फक्त कंपनीचे हित जोपासण्याचे धोरण प्रशासन अवलंबित असल्याने प्रकलग्रस्तात असंतोष वाढला आहे. एका निश्चित आराजी मागे नोकरी व ३० वर्षांपासून भूमिहीन केल्याबद्दल सानुग्रह अनुदान देण्यात यावे तसेच खोटे गुन्हे दाखल करून मुस्कटदाबी धोरण प्रशासनाने राबवू नये या प्रमूख मागण्या घेऊन वरोरा येथील विश्राम गृहात माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री व विद्यमान केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज भैया अहिर व आमदार करन देवतळे यांची भेट घेतली. निपॉन प्रकल्पग्रस्तांचा खडानखडा अभ्यास असल्याने प्रकल्पग्रस्तांची मागणी हि रास्त व न्यायोचित असल्याचे प्रतिपादन करून याकरिता विधायक मार्गाचा अवलंब करावा.. असे आवाहन त्यांनी केले. सदर शिष्टमंडळात प्रवीण सातपुते, वासुदेव ठाकरे, मधुकर सावनकर, अनुप कुटेमाटे, बंडू भादेकर, सुधीर सातपुते, सुरेश बदखल उपस्थित होते. अशी माहिती प्रसिद्धी प्रमूख लिमेश माणूसमारे यांनी दिली.
byमीडीया पोलीस टाईम
-
0

