अटकळी येथे महसुल सप्ताह शिबीर संपन्न शासकीय सेतु सुविधा केंद्रांतर्गत प्रमाणातपत्र नागरीकांना वाटप (रामतीर्थ सर्कल प्रतिनिधी गणेश कदम.बिलोली ) तालुक्यातील मौजे अटकळी येथे महसूल विभाग व तहसिल बिलोली कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्कलमधील गावातील समस्या महसुल दिन व वन विभाग महाराष्ट्र शासनाने १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट महसूल सप्ताह व छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर आयोजित करण्यात आला होता त्या अनुषंगाने सकाळी ठिक १० वाजता पहिल्या प्रथम शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे दिपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.नंतर महसूल विभागाच्या वतीने सत्कार समारंभ सरपंच उपसरपंच ,पोलिस पाटील, कर्मचारी मंडळ अधिकारी तलाठी यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष अटकळी गावचे माजी सरपंच विनोदरावजी देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले.प्रमुख मान्यवर यांच्या हस्ते सेतु सुविधा केंद्रांतर्गत निघनारे रहिवासी,कास्ट, उत्पन्न,सातबारा, प्रमाणपत्र महसुल सप्ताह दिन राबवण्यात आलेल्या गावातील प्रतिष्ठित नागरिकांना प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.यावेळी कार्यक्रमांचे अध्यक्ष माजी सरपंच विनोरावजी देशमुख, सरपंच प्रतिनीधी उत्तम बत्तलवाड, उपसरपंच रनवीर डोंगरे, शिवाजी डोंगरे,माजी सोसायटी चेअरमन भगवानराव जाधव,महसुल मंडळ अधिकारी मुंडकर मॅडम तलाठी प्रणिता काळे मॅडम सेतु संचालक राजेश टाकळीर,अमोल शेरे सदस्य प्रतिनिधी व सर्व पोलीस पाटील गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.सुत्रसंचालन तलाठी प्रणिता काळे मॅडम यांनी केले तर आभारप्रदर्शन अमोल शेरे यांनी केले.
byMEDIA POLICE TIME
-
0