हिप्परगा थडी ग्रामपंचायत येथे, आण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी. (मारोती एडकेवार नांदेड /जिल्हा प्रतिनिधी) नांदेड : जग बदल घालुनी घाव सांगून गेले मज भीमराव,दलितांच्या व्यथा व त्या व्यक्तीचे कथा, साहित्याच्या माध्यमातून जगाच्या वेशीवर टांगणारे,पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून गोरगरीब कष्टकरांच्या तळ हातावर तरलेली आहे, असे जगाला सांगणारे. साहित्यसम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची, आज जयंती हिप्परगा थडी ग्रामपंचायत कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आले, व हिप्परगा थडी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती मंडळ,यांच्याकडून जयंती नाचनू नाही तर वाचून साजरी करण्याच निर्णय घेण्यात आला. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या, जयंतीनिमित्त गोरगरीब व समाजातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका निर्माण करण्याचे कार्य हाती घेतले, या कार्यासाठी हिप्पारगा थडी गावचे सरपंच इनामदार रयबर यांनी आर्थिक मदत आज जयंती निमित्त करण्यात आले, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच इनामदार रयबर व उपसरपंच मारुती एडकेवार यांच्या हस्ते करण्यात आले व सर्व ग्रामपंचायत सदस्य, व शिक्षण प्रेमी व ग्रामपंचायत सेवक राजू पिराजी अंजनीकर, माजी ग्रामपंचायत सदस्य गंगाराम सयाजी एडकेवार, सामाजिक कार्यकर्ते दीपक एडकेवार, प्रमोद बेलकर,व अंगणवाडी सेविका, व ग्रामपंचायत सर्व कर्मचारी,व समाजसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हिप्परगा थडी ग्रामपंचायत येथे, आण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.                                         
Previous Post Next Post