उल्हास पांडे यांचीसेलूच्या नूतन प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापक पदी नियुक्ती. ( शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.)सेलू : येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेद्वारे चालवल्या जाणाऱ्या सौ. सावित्रीबाई बद्रीनारायणजी बिहाणी नूतन प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापक पदी उल्हास पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस. एम. लोया यांनी शुक्रवारी, १ ऑगस्टरोजी याबाबतचे नियुक्तीपत्र दिले आहे. या वेळी उपाध्यक्ष डी. के. देशपांडे, सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाशजी बिहाणी, शालेय समिती अध्यक्ष मकरंद दिग्रसकर, कार्यकारणी सदस्य दत्तरावजी पावडे, प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, राजेशजी गुप्ता तसेच शिक्षक उपस्थित होते. या प्रसंगी उल्हास पांडे यांनी शाळेच्या विकासासाठी नेहमीच तत्पर राहण्याची ग्वाही दिली.
byMEDIA POLICE TIME
-
0