9 लाखाची पिशवी हिसकावून चोरट्यांचा पोबारा ❗तळोदा येथील स्टेट बँकेच्या आवारातील घटना ‼️दिवसा ढवळ्या पोलिसांना चोरट्यांचे आव्हान (कैलास शेंडे जिल्हा प्रतिनिधी नंदुरबार) नंदुरबार:तळोदा - येथील स्टेट बँकेतून 9 लाखाची रक्कम घेऊन बाहेर आलेल्या सेवानिवृत्त शिक्षकाच्या हातातून पिशवी हिसकावून 2 चोरट्यानी पळ काढल्याची घटना घडली आहे घटनेत चोरट्यांचा पाठलाग करणारा शिक्षकांच्या मुलाचा अपघात होऊन तो जबर जखमी झाला आहे दिवसाढवळ्या भर गर्दी च्या ठिकाणी घडलेल्या चोरीच्या घटनेने तळोदा शहरात खळबळ माजली असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की तळोदा तालुक्यातील तळवे येथील रहिवासी सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक देविदास मंगा मराठे हे मागील 30 सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त झाले त्यांची सेवानिवृत्ती ची रक्कम भारतीय स्टेट बँक शाखा तळोदा येथे जमा झाली जमा रक्कम काढण्यासाठी देविदास मराठे हे आज त्यांचा मुलगा संकेत देविदास मराठे याच्या सोबत बँकेत आले व त्यांनी दुपारी सव्वा दोन वाजता 9 लाख रोख रक्कम काढली व कापडी पिशवीत ठेवून बाहेर आले व त्यांच्या मुलगा संकेत याच्या मोटरसायकल वर मध्ये पिशवी ठेवून बसत असताना आधीच त्यांच्यावर बँकेत पाळत ठेवून असलेल्या दोन जणांनी मागून मोटरसायकल वर येत देविदास मराठे यांच्या हातातून पिशवी हिसकावली व पळ काढला ही बाब मोटरसायकल वर बसलेला देविदास मराठे यांचा मुलगा संकेत याच्या लक्षात येताच त्याने तसाच त्यांच्या पाठलाग सुरू केला आधी चोरटे बँकेच्या आवारातून चिनोदा रोड वर आले व तेथून बिरसा मुंडा चौक मार्गे शहादा रस्त्याने भरधाव वेगाने जात असतांना त्यांच्या मागे असलेल्या संकेत याच्या शहादा रस्त्यावरील जैन शॉपी समोर खड्डा व त्यातील वाळू बाहेर आलेली असल्याने त्यावर मोटरसायकल घसरून अपघात झाला त्यात तो जबर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारार्थ नंदुरबार येथे हलविण्यात आले आहे त्यानंत पोलिसांना घटनेची खबर दिली असता स पो नि राजू लोखंडे व पो उ नि महेंद्र पवार हे पोलिसांसह घटनास्थळी पोहोचले व त्यांनी बँकेचे सीसीटीव्ही फुटेज तपासून पुढील कार्यवाही करीत आहेत घटनास्थळी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरक्षक किरण खेडकर यांनी सुद्धा भेट देऊन तपासाबाबत कार्यवाही हाती घेतली आहे

9 लाखाची पिशवी हिसकावून चोरट्यांचा पोबारा ❗तळोदा येथील स्टेट बँकेच्या आवारातील घटना ‼️दिवसा ढवळ्या पोलिसांना चोरट्यांचे आव्हान                       
Previous Post Next Post