*“भोंदू महाराजांविरोधात एकता संघटना आक्रमक” — कठोर कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन!** नाशिक-अहिल्यानगर अत्याचार प्रकरणाने उसळला संताप, आरोपींसह राजकीय नेत्यांवरही कारवाईची मागणी*(रावेर / शेख शरीफ) नाशिक येथील कॅप्टन अशोक खरात व अहिल्यानगरमधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली असून, जळगाव जिल्हा एकता संघटनेने या गंभीर प्रकरणात थेट मुख्यमंत्र्यांकडे धडक निवेदन सादर केले आहे.या निवेदनात तथाकथित महाराजांच्या नावाखाली सुरू असलेल्या भोंदूगिरीवर कठोर प्रहार करत, आरोपींना तात्काळ अटक करून POCSOसह गंभीर गुन्ह्यांतर्गत कारवाई करण्याची ठाम मागणी करण्यात आली आहे.*“आरोपींना संरक्षण देणाऱ्यांनाही सोडणार नाही” — संघटनेचा इशारा*संघटनेने स्पष्ट शब्दांत म्हटले आहे की, अशा भोंदू व्यक्तींना राजकीय नेते व काही अधिकारी वर्गाकडून मिळणारा आश्रय हा अधिक धोकादायक आहे. त्यामुळे आरोपींसोबतच त्यांना पाठबळ देणाऱ्या सर्वांवर गुन्हे दाखल करून सखोल चौकशी करावी. *SIT चौकशी व फास्ट ट्रॅक कोर्टाची मागणी*प्रकरणाची विशेष तपास पथक (SIT) मार्फत चौकशी करून, फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवावा व दोषींना फाशी किंवा जन्मठेपेसारखी कठोर शिक्षा द्यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.“भोंदू महाराज नियंत्रण कायदा” लागू करण्याची मागणीभविष्यात अशा घटना टाळण्यासाठी राज्यात “भोंदू महाराज नियंत्रण विशेष विधेयक” तातडीने लागू करावे तसेच अशा व्यक्तींची प्रसिद्धी करणाऱ्या राजकीय नेते व अधिकाऱ्यांवर कायदेशीर बंदी घालावी, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.*१०० हून अधिक महिलांचा सहभाग*, मान्यवरांची उपस्थितीया आंदोलनात महिला प्रतिनिधी नाजिया शेख व पुरुष प्रतिनिधी फारूक शेख यांच्या नेतृत्वाखाली १०० हून अधिक महिलांनी सहभाग घेतला.*यामध्ये विशेषतः सहभागी मान्यवरांमध्ये*मौलाना रहीम पटेल, मौलाना गुफरान, मौलाना इमरान काकर, श्रीमती शबीना हरीश, सौ. रिजवान रहमान, सौ. सकीना शेख इस्माईल, सौ. हाजरा फारूक शेख, बुशरा आमिर शेख, सायमा उमर शेख, निखत ताहेर, मतीन पटेल, अनीश शाह, आरिफ देशमुख, सईद शेख, ताहेर शेख, रऊफ टेलर, अकील शेख, मुजाहिद खान, काशिफ शेख, तौसीफ खान, वसीम रियाज आदींचा समावेश होता.*“कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन”* — प्रशासनाला इशाराप्रशासनाने तात्काळ कठोर पावले उचलली नाहीत, तर रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा एकता संघटनेने दिला आहे. एकूणच, या प्रकरणामुळे राज्यात भोंदूगिरीविरोधात मोठा जनआक्रोश उफाळून आला असून, आता सरकार काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

             भोंदू महाराजांविरोधात एकता संघटना आक्रमक” — कठोर कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन!**             नाशिक-अहिल्यानगर अत्याचार प्रकरणाने उसळला संताप, आरोपींसह राजकीय नेत्यांवरही कारवाईची मागणी
Previous Post Next Post