शहादा पोलिसांची धडक कारवाई 60 लाख रुपये किमतीच्या अवैध दारू साठा जप्त

शहादा पोलिसांची धडक कारवाई 60 लाख रुपये किमतीच्या अवैध दारू साठा जप्त

कैलास शेंडे विभागीय संपादक नंदुरबार

नंदुरबार: शहादा पोलिसांनी अवैध दारू वाहतुकीविरोधात धडक मोहीम राबवत तब्बल ६० लाख १२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आयशर ट्रकमधून होणारी ही तस्करी पोलिसांनी पाठलाग करून उघडकीस आणली.
​दिनांक २/५/२०२६ रोजी शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शहादा हद्दीतून अवैध मद्य वाहतूक होणार आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने शहादा ते दोंडाईचा रोडवर नाकाबंदी लावली.
​तपासणी सुरू असताना एक आयशर वाहन (क्रमांक RJ 27 GE 9527) नाकाबंदीच्या ठिकाणी न थांबता भरधाव वेगाने प्रकाशा रोडकडे निसटले. संशय बळावल्याने पोलिसांनी तातडीने पाठलाग करून वाहन रोखले.
 ​वाहनाची झडती घेतली असता त्यात विदेशी दारूचे ५३५ बॉक्स आढळले. पोलिसांनी दारू आणि वाहन असा एकूण ६०,१२,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे:
त्यात ​जिवनराम होशियारसिंग इटकांड (वय ३५ वर्षे, राहणार हरियाणा)

​अजयकुमार जयवीर दहिया (वय ३१ वर्षे, राहणार हरियाणा)
या संशयीता विरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१८, २१७ सह महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई), १०८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही यशस्वी कारवाई शहादा उप विभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण सोनवणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दिपक चौधरी, पोलीस शिपाई भगवान सावळे आणि कपिल मंदील यांच्या पथकाने केली आहे.
Previous Post Next Post